Mental Health  Dainik Gomantak
गोवा

युक्रेनमधून परतलेले गोमंतकीय विद्यार्थी मानसिक धक्क्यात, समुपदेशनाची गरज

आरोग्य तज्ज्ञ नेहमी पालक आणि मुलांना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) बद्दल जागरूक राहण्यास सांगतात.

Akash Umesh Khandke

पणजी: युद्धग्रस्त युक्रेनमधून गोमंतकीय विद्यार्थी सुखरूप मायदेशी परतले असले तरी तेथील युद्धाच्या आणि संघर्षाच्या आठवणी आणि वाईट अनुभव त्यांच्या प्रकृतीवर परिणाम करू शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांच मत आहे.

आरोग्य तज्ज्ञ नेहमी पालक आणि मुलांना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) बद्दल जागरूक राहण्यास सांगतात. मुलाच्या वागणुकीत फरक जानवल्यास तातडीने मानसशास्त्रज्ञांची मदत घेण्याचा सल्ला देखील ते देतात.

मानसिक आरोग्य केंद्र संगतने युक्रेनमधून परत आलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन देण्यासाठी ReachOut नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत त्यांनी टोल-फ्री हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे.

“ज्यांना अशा तीव्र आघाताचा अनुभव येतो, त्यांना PTSD ची लक्षणे दिसतात. असा मुलांना त्यांच्या भविष्याची काळजी लागून राहते. आम्ही या मुलांची मदत करण्यासाठी पुढे आलो आहोत," ReachOut कार्यक्रमाचे प्रमुख डॉ अभिजित नाडकर्णी म्हणाले.

“या विद्यार्थ्यांसाठी (Students) हे सुरुवातीचे दिवस असले तरी, कोणत्याही प्रकारच्या आघाताचा या विद्यार्थ्यांच्या मनावर दीर्घकालीन प्रभाव पडतो हे दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. त्यापैकी काहींवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे,” डॉ नाडकर्णी म्हणाले.

पोस्ट-ट्रॉमाटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे काय

पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) ही एक मानसिक स्थिती आहे जी एखाद्या भयानक घटनेमुळे उद्भवते. बहुतेक लोक जे अत्यंत क्लेशकारक घटनांमधून जातात त्यांच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) परिणाम होऊ शकतो. यातून बाहेर येण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT