प्रमोद सावंत 23 मार्चला घेणार गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ?

भारतीय जनता पक्षाच्या (Goa BJP) नवनिर्वाचित आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांना पसंती दर्शविली आहे.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्याचे काळजीवाहु मुख्यमंत्री प्रमोद सावंत 23 मार्च रोजी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शक्यता असून, शपथविधी कार्यक्रम भव्य असेल. भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत माहितीनुसार, प्रमोद सावंत 23 मार्च रोजी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. ते सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून गोव्यात भाजपचे हे सलग तिसरे सरकार असेल. यापूर्वी मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गोव्यात दोनदा सत्ता मिळवली आहे. (Pramod Sawant is likely to be sworn in as Goa's chief minister on March 23)

Goa CM Pramod Sawant
मडगाव येथे पार्क केलेल्या कारमधून लॅपटॉप चोरीला

बहुसंख्य सदस्यांची प्रमोद सावंत यांनाच पसंती

भारतीय जनता पक्षाच्या (Goa BJP) नवनिर्वाचित आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांना पसंती दर्शविली आहे. पक्षाच्या अंतर्गत भेटीगाठीतून पुढे आलेला हा निष्कर्ष आहे. नवी दिल्लीमध्ये हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी या पदासाठी स्वतःचे नाव पुढे दामटले होते. दुसरीकडे गोव्यात विश्वजीत राणे अजूनही मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक आहेत. परंतु सर्वांच्या पसंतीने येत्या 20 किंवा 21 मार्चला विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत प्रमोद सावंत यांची निवड मुख्यमंत्रिपदी होईल, हे आता निश्चित झाले आहे.

होळी उत्सवानंतर गोव्यात (Goa) नेतेपद निवडीची प्रक्रिया रितसर सुरू होईल, असे संकेत दिल्लीहून पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. दिल्ली भेटीनंतर आत्मविश्वास वाढलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निवडीचे आता केवळ सोपस्कार बाकी राहिले आहेत. यापूर्वी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर नेता निवडीचे जे राजकारण घडले, तशीच काहीशी परिस्थिती

मुख्यमंत्र्यांसाठी ‘टर्निंग पॉईंट’

‘इंडिया टुडे’ व इतर काही वृत्तवाहिन्यांच्या ‘एक्झिट पोल’मध्ये मुख्यमंत्री पदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांना केवळ 20 टक्केच पसंती आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नवीन नेत्याच्या शोधात आहेत काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु सावंत यांच्या नशिबाने ते साखळीमध्ये जिंकून आले. निवडणूकपूर्व बहुसंख्य सर्वेक्षणांमध्ये भाजपला केवळ 14 ते 16 जागा मिळू शकतात, असा निष्कर्ष आला असतानाही पक्षाने ३३ टक्के मते मिळूनही तब्बल 20 जागा पटकावत राज्यातील सर्वांत मोठा पक्ष बनण्याची किमया केली. त्यामुळे प्रमोद सावंत यांचे राज्यातील राजकीय वजन वाढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com