Goa Drowning Death Dainik Gomantak
गोवा

Mandovi Bridge: परीक्षेत कमी गुण, वडील रागावले! विद्यार्थिनीने मांडवी पुलावरून मारली उडी, पोलिसांमुळे वाचला जीव

Mandovi Bridge Student Jump: या घटनेची माहिती मिळताच तिचे वडील घटनास्थळी दाखल झाले. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तिला वडील रागावले होते त्यामुळे ती संवेदनशील झाली होती.

Sameer Panditrao

पणजी: जुन्या मांडवी पुलावरून उडी घेतलेल्या १७ वर्षांच्या मुलीला पणजी किनारपट्टी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. ही घटना मंगळवारी (ता.२४) सकाळी १०.४५ वा.च्या सुमारास घडली. परीक्षेत पडलेल्या कमी गुणांमुळे वडील रागावल्याने ती रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी मांडवी पुलावर आली होती. तिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पणजी किनारपट्टी पोलिस स्थानकाचे निरीक्षक अजित उमर्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वरीचे पोलिस उपअधीक्षक विश्‍वेश कर्पे हे पर्वरीहून पणजीच्या दिशेने पोलिस मुख्यालयातील पोलिस बैठकीसाठी जीपने येत होते. त्यावेळी त्यांना एक मुलगी पुलावर धक्क्याला टेकून उभी असल्याची दिसली. तेथे पोहोचेपर्यंत अचानक तिने धक्क्यावर चढून मांडवी नदीत उडी घेतली.

उपअधीक्षक कर्पे यांनी क्षणाचाही विलंब न करता जीप घेऊन किनारपट्टी पोलिस स्थानकाला ही माहिती दिली. किनारी पोलिस योगीराज चोडणकर व महेश खरवत हे किनारपट्टी बोट घेऊन मुलीने उडी घेतलेल्या ठिकाणी पोहोचले व गटांगळ्या खात असलेल्या मुलीला पाण्यातून बाहेर काढले. तिची प्रकृती काहीशी नाजूक असल्याने १०८ रुग्णवाहिकेने तिला गोमेकॉत नेण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच तिचे वडील घटनास्थळी दाखल झाले. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तिला वडील रागावले होते त्यामुळे ती संवेदनशील झाली होती. तिने आज सकाळी घरातून बाहेर पडून मांडवी पूल गाठला. ती पुलावर चालत गेली व त्यानंतर अकस्मात मांडवी नदीत उडी घेतली. पोलिस उपअधीक्षक विश्‍वेश कर्पे यांनी व किनारपट्टी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तिला जीवदान मिळाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

पोलिसांच्या धाडसाचे कौतुक

या अल्पवयीन मुलीला वाचवताना या थरारक बचावकार्यात दाखवलेली तत्परता, प्रसंगावधान आणि धाडसामुळे किनारी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपअधीक्षक विश्‍वेश कर्पे यांनी वेळीच दिलेल्या माहितीमुळे तसेच या पोलिसांनी वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे एका निरागस मुलीचा जीव वाचविल्याने ते कौतुकास पात्र असल्याचे मत काही स्थानिकांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Railway Project: 'गोवा कोल हब बनणार नाही...'; रेल्वे दुहेरीकरणावरुन मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही, पण वाद कायम

High Court: गोवा सरकारला मोठा झटका; वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील Sports Quota रद्द

Sara Tendulkar Goa Vacation: सारा तेंडुलकरचे गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल! मिस्ट्री मॅनसोबतच्या जवळीकतेने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे तो?

Goa News: गोव्यात सरकारी कर्मचारी अजूनही Holiday च्या मूडमध्ये; जनतेची कामे ठप्प

Viral Video: 'पूर नव्हे, अल्लाहचा आशीर्वाद'! पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा पूरग्रस्तांना अजब सल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT