Goa Drowning Death: बुडणाऱ्याला वाचवायला गेला.. आणि स्वतःच बुडाला! पणजी सांतिनेझ येथील घटना; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

St Inez Lake Drowning Death: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेले काही दिवस पडणाऱ्या पावसामुळे हा तलाव पाण्याने तुडुंब भरला आहे. आज चार ते पाच तरुण या तलावात पोहण्यासाठी उतरले होते.
Goa Drowning Death
Goa Drowning Death Dainik Gomantak
Published on
Updated on

सांतिनेझ: येथील श्री आप्टेश्‍वर गणपती मंदिरामागे असलेल्या एका लहान तलावात (थिगूर बाय) एका तरुणाला बुडताना वाचवण्यासाठी उतरलेल्या तरुणाचाच दुर्दैवी बुडून मृत्यू झाला, तर बुडणाऱ्या तरुणाला वाचवण्यात तलावाजवळ असलेल्या इतरांना यश आले.

ही दुर्घटना आज सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव साई वैभव वायंगणकर (वय २७ वर्षे, सांताक्रुझ) असून त्याचा मृतदेह पोलिस व अग्निशमन दल पोहचण्यापूर्वीच गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. शवचिकित्सा उद्या, २४ रोजी केली जाणार असून याप्रकरणी पणजी पोलिस चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेले काही दिवस पडणाऱ्या पावसामुळे हा तलाव पाण्याने तुडुंब भरला आहे. आज चार ते पाच तरुण या तलावात पोहण्यासाठी उतरले होते. त्यातील काहींना पोहता येत नव्हते. एकजण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्यावर साई वायंगणकर याने त्याला वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र, त्याला वाचविण्याऐवजी तोच बुडाला.

Goa Drowning Death
Goa Drowning Death: पालकांच्या निष्‍काळजीपणामुळे 2 बालिकांचा बुडून अंत; शिरवई व आगोंद येथील घटना, 24 तासांत 3 बळी

गटांगळ्या खाणाऱ्या जॉनथन या तरुणाला इतरांनी वाचविले. बुडालेल्या साईला पाण्याबाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेने गोमेकॉत नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बचावलेल्या जॉनथन यालाही गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती सुधारत आहे. लवकरच या तलावात उतरलेल्या अन्य तरुणांच्या जबान्या नोंदवण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Goa Drowning Death
Goa Drowning Death: फक्त फलक लावून होणार नाही; धबधबे, तलाव, समुद्रकिनाऱ्यांवर 'सुरक्षा रक्षक' हवेच

‘सांजाव’वेळी दक्षता घ्यावी

सांतिनेझ येथील तलाव हा ‘थिगूर बाय’ म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात या तलावात पाणी साचल्यावर ताळगाव आणि सांताक्रुझ परिसरातील अनेकजण या तलावात मौजमजेसाठी येतात. ‘सांजाव’वेळी या तलावावर तरुणांची बरीच गर्दी असते. या तलावात बुडून मृत्यू होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे हा तलाव धोकादायक म्हणून माहीत असूनही तरुण तेथे पावसात पोहण्यासाठी जातात. याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सांजाववेळी येथे उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com