patradevi check post Dainik Gomantak
गोवा

गोव्यात शिवसैनिकांचा धाक; पत्रादेवी नाक्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त

एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांचे काही तासात गोव्यात आगमन होणार

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि सहकारी गोव्यात आगमन होणार आहे. आणि त्याच अनुषंगाने एखाद्या वेळी महाराष्ट्रातील शिवसैनिक येऊन गोव्यात धुमाकूळ घालील की काय अशी शक्यता लक्षात घेऊन गोवा सरकारने पत्रादेवी बांदा, किरणपाणी आरोन्दा व सातार्डे न्हयबाग या चेक नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे.

महाराष्ट्र भागातून गोव्यात येणार्‍या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी केली जाते. एखादा शिवसैनिक या वाहनातून येत नसेल ना याची चौकशी पोलीस करताना चित्र नाक्यावर दिसून येत आहे. पेडणे तालुका पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक मोपा विमानतळ पोलिस निरीक्षक महेश केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्र शिवसेनेचे सरकार सध्या अल्प मतात आल्यानंतर आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आणि तो गट उशिरापर्यंत गोव्यात येणार आहे. आणि त्या निमित्ताने पत्रादेवी बांदा, सातरडा न्हयबाग आणि किरण पाणी आरोंदा या तीन चेक नाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

एखाद्या वेळी महाराष्ट्रातील शिवसैनिक ज्या ठिकाणी बंडखोर नेते आणि आमदार वास्तव्य करून आहेत त्याठिकाणी त्या हॉटेलात येऊन परिसरात गोंधळ घालण्याची शक्यता लक्षात घेऊन हा पोलिस बंदोबस्त याठिकाणी वाढवलेला आहे.

तीन नाक्यावर अचानक पोलिस बंदोबस्त तथा नाकाबंदी झाल्यानंतर थोड्या प्रमाणात वाहनचालकांमध्ये गोंधळ उडाला. सध्या कोरोना महामारी चा काळ अजूनही अस्तित्वात असल्याने कोरोना वाढला की काय किंवा प्रवेश बंदी आहे की काय? अशी स्थिती नाक्यावर दिसून येत होती. त्या वेळी प्रत्येक पोलीस वाहनचालकांना नाकाबंदी विषयी माहिती देताना चित्र तीन नाक्यावर दिसून येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT