आम्हाला कोणी रोखू शकत नाही; एकनाथ शिंदे आक्रमक पवित्र्यात

“छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आणि धर्मवीर आनंद दिघेंना करणार वंदन''
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात सुरु असलेली राजकीय खडाजंगी आता अंतिम टप्यात असल्याने राजकीय घडामोडी वेग घेत आहेत. मिळालेल्या माहितीनूसार शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि काही भाजप नेते आज सायंकाळी आसाम येथून थेट गोव्यात पोहोचणार आहेत. गोव्यातील विश्रांतीनंतर ते मंगळवारी महाराष्ट्र विधानभवन येथे पोहोचतील. या प्रवासाला निघण्यापूर्वी बंडखोर नेत्यांनी गुवाहाटी येथील कामाख्या मंदिराला भेट दिली. यावेळी बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ( Political crisis in Maharashtra; ShivSena rebel MLA Eknath Shinde is aggressive )

Eknath Shinde News
16 आमदार अपात्र ठरले तर महाविकास आघाडीचे सरकार वाचणार का?

कामाख्या मंदिर दर्शनानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने आम्हाला कोणाही रोखू शकत नाही. तसेच आपण फ्लोअर टेस्टला घाबरत नाही. आमचे 50 आमदार आहेत. प्रक्रिया काहीही असली तरी आम्ही पूर्णपणे उत्तीर्ण होऊ. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

लोकशाहीत संख्या महत्त्वाची असते. राज्यपालांनी गुरुवारी फ्लोर टेस्ट घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामूळे जी प्रक्रिया असेल, त्यात आम्ही जिंकू. लोकशाहीत क्रमांक आणि बहुमताला महत्व असतं. या देशात संविधान, कायदा आणि नियमाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. केवळ प्रक्रिया पुर्ण होण्याचा अवकाश असल्याचं ही ते म्हणाले.

यावेळी शिंदे यांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार का ? असं विचारलं असता ते म्हणाले की, “बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरही जाणार, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर आनंद दिघेंनाही वंदन करणार. ही बाळासाहेब ठाकरेंची, हिंदुत्वाला पुढे नेणारी, आनंद दिघेंचं विचार पुढे नेणारी शिवसेना आहे.

महाराष्ट्र हे जनतेचं राज्य असून त्याचा विकास करण्यासाठी, प्रगतीपथावर नेण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेत आहे”. असे ते म्हणाले आहेत. त्यामूळे शिवसेनेचं भविष्य काय होणार या प्रश्नाने अनेक नेत्यांकडून विचार जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com