Lok Sabha Election Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: गोव्यात येणाऱ्या वाहनात तब्बल 10 लाखांची सापडली रोकड; फोंडाघाट चेकनाक्यावर केली तापसणी

Lok Sabha Election: लोकसभा निवडणूक : वाहनांची कडक तपासणी; 17 जणांविरोधात गुन्हे

दैनिक गोमन्तक

Lok Sabha Election:

राज्यात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिस यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे. उत्तर गोव्यातील विविध पोलिस स्थानकांच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी रस्त्यांवर नाकाबंदी व गस्तही सुरू केली आहे.

काल मध्यरात्री पोलिसांनी नाकाबंदी करून 425 वाहनांची तपासणी केली. गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तसेच रात्री उशिरा रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या गोव्यातील वाहनांचाही त्‍यात समावेश आहे. या तपासणीवेळी काळ्या काचांच्या वापराप्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

गोव्यात येणाऱ्या एका वाहनाची महाराष्ट्र पोलिसांनी फोंडाघाट चेकनाक्यावर केलेल्या तापसणीत 10 लाखांची रोकड सापडली होती. त्‍यामुळे गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची गोव्याच्या चेकनाक्यांवर कसून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोवा पोलिसांनी शेजारील राज्यांच्या पोलिसांशी हल्लीच समन्वय बैठक घेतली. त्यावेळी अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी माहितीची देवाण-घेवाण करण्याचे ठरवण्यात आले. निवडणूक आयोगानेही 50 हजारांपेक्षा अधिक रोकड बाळगणाऱ्यांनी त्याचे स्पष्टीकरण दिले नाही किंवा त्याचा स्रोत उघड न केल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

निवडणुकीदरम्यान राज्यात तसेच आंतरराज्य वाहतुकीवेळी अशा मोठ्या प्रमाणात रोकड तस्करी होण्याची संभवाना लक्षात घेऊन गोव्यातील चेकनाक्यांवर पोलिसांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निवडणूक काळात पोलिस यंत्रणेवर निवडणूक आयोगाचे नियंत्रण असणार आहे. राजकारण्यांना अप्रत्यक्षपणे मदत केल्यास व कामात बेशिस्तपणा दिसून आल्यास वा राजकीय पक्षाकडून तक्रारी आल्यास त्याची शहानिशा करून कारवाई होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांमध्ये आयोगाबाबत भय असतो. यापूर्वी काही पोलिस अधिकाऱ्यांना अशा कारवाईंना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे.

केंद्रीय निमलष्करी दलाच्या 16 तुकड्या

निवडणुकीच्या काळात गोव्‍यात कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस खात्यातील पोलिस, गृहरक्षक दल शिवाय केंद्रीय निमलष्करी दलाच्या 16 तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. त्यातील दोन तुकड्या गेल्या आठवड्यात आल्या आहेत. सध्या या दोन्ही तुकड्यांच्‍या शस्त्रधारी पोलिसांचा फ्लॅग मार्च दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. मतदारांना मुक्तपणे मतदान करणे शक्य व्हावे तसेच दहशत माजवण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना वचक बसावा यासाठी हे फ्लॅग मार्च करण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT