Goa Police: लोकसभा निवडणूक आचारसंहिता! गोवा पोलिसांकडून कडक तपासणी, उत्तरेत 17 गुन्हे दाखल

Goa Police tighten checking at checkpost: उत्तर गोव्यात मंगळवारी (दि.19) पोलिसांनी 425 वाहनांची तपासणी करत, 17 वाहन चालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Goa Police tighten checking at checkpost
Goa Police tighten checking at checkpostDainik Gomantak

Goa Police tighten checking at checkpost

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात आचारसंहिता लागू झाली असून, प्रत्येक राज्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. गोव्यात देखील प्रत्येक तपासणी नाक्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

उत्तर गोव्यात मंगळवारी (दि.19) पोलिसांनी 425 वाहनांची तपासणी करत, 17 वाहन चालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक 2024 आणि आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी लक्षात घेता, उत्तर गोव्यात 19 मार्च रोजी नाकाबंदी करण्यात आली. यावेळी एकूण 425 वाहनांची तपासणी करण्यात आली असून टिंटेड ग्लास असलेल्या 17 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती उत्तर गोवा पोलिसांनी दिली.

Goa Police tighten checking at checkpost
पेडणे, बार्देशमधील वीज ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, ...अन्यथा वीज कनेक्शन तोडले जाणार

देशात लागू आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजनाबाबत दक्षिण आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. राज्यातील सर्व नाक्यांवर कडेकोड पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

राज्यात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Goa Police tighten checking at checkpost
Elvish Yadav: एल्विशने गोवा, पंजाबमध्येही पुरवले सापाचे विष? सखोल तपास होणार

कणकवलीत दहा लाखांची रोखड जप्त

कणकवली पोलिसांनी मंगळवारी एका वाहनांच्या तपासणीत दहा लाखांची रोकड जप्त केली. गोवा नोंदणीकृत असलेले हे वाहन कोल्हापूरातून गोवामार्गे सिंधुदुर्गच्या दिशेने जात होते. दरम्यान, कणकवली पोलिसांनी संशय येताच वाहनाला थांबवून तपासणीत दहा लाखांची रोकड जप्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com