Pramod Sawant|Goa Education Department Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम नको अन्यथा...', मुख्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा

Teacher's Day 2024: विद्यार्थ्यांची कोणत्या विषयात आवड जाणून घेऊन त्यासंबंधी कोणत्या रोजगाराच्या संधी आहेत त्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे शिक्षकांचे कर्तव्य

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील अनुदानित शाळांच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्यांच्यावर सरकारचा वचक नसल्याचा लोकांचा समज होत आहे; परंतु अशाप्रकारच्या गैरवर्तनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे दिसून आल्यास सरकार म्हणून शिक्षक तसेच संस्थाचालकांवर छडी उगारण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

कला अकादमी येथे शिक्षकदिनानिमित्त आयोजित मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगावकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारने घोषित केलेल्या ‘मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कारां’चे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांची कोणत्या विषयात आवड आहे, हे जाणून घेऊन त्यासंबंधी कोणत्या रोजगाराच्या संधी आहेत त्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे शिक्षकांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जर शिक्षकांनी आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडल्यास सरकारला त्याची मदत होईल.

स्मार्ट शिक्षकांमुळे क्लासरूम स्मार्ट

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात भविष्यात शिक्षक राहतील का, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो; परंतु शिक्षक काल, होते आज आहेत आणि भविष्यातही राहणार आहेत. केवळ आजच्या शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान अंगीकारले पाहिजे. विविध उपकरणे आली म्हणजे क्लासरूम स्मार्ट होत नाहीत, तर स्मार्ट शिक्षकांमुळे क्लासरूम स्मार्ट होतात, असे प्रतिपादन शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी केले.

कामुर्लीतील शिक्षकांना निलंबित केले असून भविष्यातही कठोर निर्णय घेण्यात येतील. शिक्षक हे समाजासह देशाचे सक्षम नागरिक घडवितात. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान देणे काळाची गरजच आहे.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT