Teacher's Day 2024: दडपणाखाली आहे का आजचा शिक्षक? अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा सर्वात मोठा दबाव

Teacher's Day 2024: शिक्षक हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. पण आजचा शिक्षक हा दबावाखाली असल्याचे बऱ्याचदा दिसून येते.
Teacher's Day 2024: दडपणाखाली आहे का आजचा शिक्षक? अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा सर्वात मोठा दबाव
Teacher
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

शिक्षक हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. पण आजचा शिक्षक हा दबावाखाली असल्याचे बऱ्याचदा दिसून येते. त्‍यामुळे त्याच्या शिकवण्यावरही मर्यादा पडतात. वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणे हा शिक्षकांवर असलेला सर्वात मोठा दबाव. खास करून दहावी, बारावीत शिकवणाऱ्या शिक्षकांना याचा प्रत्यय येतो.

बारावीची परीक्षा फेब्रुवारीत होणार आहे. त्‍यामुळे शिक्षकांना प्रिलिमनरी परीक्षा डिसेंबरमध्‍ये घ्यावी लागेल. याचा अर्थ शिक्षकाला बारावीचा अभ्यासक्रम नोव्हेंबरपर्यंतच पूर्ण करावा लागणार आहे. जून ते नोव्हेंबरचा काळ लक्षात घेतल्यास त्यांना फक्त पाच महिने मिळतील. या पाच महिन्यांत चतुर्थी, दिवाळीची सुट्टी येते. त्‍यामुळे हा काळ अधिकच कमी होणार आहे. अतिरिक्त वर्ग घेण्यापलीकडे त्यांच्याजवळ दुसरा पर्याय असणार नाही.

पूर्वी जानेवारीत प्रिलिमनरी परीक्षा घेतल्या जात होत्‍या. तरीसुद्धा अभ्यासक्रम संपावयाला शिक्षकांना अतिरिक्त वर्ग घ्यावे लागायचे. साहजिकच त्यांना तारेवरची कसरत करावी लागत असे. आता तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अधिक वेगाने धावावे लागणार आहे. दहावीतील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाही असेच शिवधनुष्य पेलण्याचे काम करावे लागत आहे. त्यामुळे या शिक्षकांची स्थिती ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ अशी होत आहे. साहजिकच विषयाला न्याय देणे कठीण जाते.

Teacher's Day 2024: दडपणाखाली आहे का आजचा शिक्षक? अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा सर्वात मोठा दबाव
Teacher's Day In Curchorem: शिक्षण मिळवावे पण नुसतेच साक्षर बनण्यासाठी नव्हे : कामत

योगेश मिराशी

हडफडे येथील रहिवासी असलेल्या नताशा कार्व्हालो यांना केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाचा यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. त्या व्यवसायाने कॉस्मेटोलॉजिस्ट आहेत. त्या एक व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट व सध्या राज्य सरकारच्या म्हापसा आयटीआयमध्ये व्यावसायिक प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

नताशा कार्व्हालो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी एक आशावादी व्यक्ती आहे. मला जे आवडते ते करते व माझे ज्ञान देशाच्या पुढच्या पिढीला देऊ शकले, यात मी धन्यता मानते. माझ्याकडील अनुभव, ज्ञानाद्वारे माझ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या करिअरच्या वाढीसाठी सकारात्मक योगदान देण्याचा मी दररोज प्रामाणिक प्रयत्न करते. मला आनंद आहे की, माझे बहुतेक प्रक्षिणार्थी स्वतः कमावणारे आहेत. त्यांनी त्यांचे सलून सुरू केले असून मेकअप आर्टिस्ट म्हणून फ्री लान्सिंग चालू केले आहे.

नताशा या २००९ मध्ये आयटीआयमध्ये हेअर व स्कीन प्रशिक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीवर कामावर रुजू झाल्या होत्या. तर २०१६ मध्ये त्यांची कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नियुक्ती झाली. कार्व्हालो या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार व थेट कार्यशाळेत भाग घेत, उपलब्ध प्रगत तंत्रांमध्ये स्वतःचे ज्ञान व कौशल्य श्रेणी सुधारित करून वेळोवेळी प्रमाणित करत आल्या आहेत. आत्तापर्यंतच्या या विलक्षण कारकिर्दीसाठी, मला माझ्या कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाच्या विभागाचे तसेच माझे पती, दोन मुले, आई-वडील व भावंडांचा पाठिंबा मिळाल्याचे ४० वर्षीय नताशा अभिमानाने सांगतात. नताशा यांना अनेक पारितोषिके मिळालेली आहेत.

Teacher's Day 2024: दडपणाखाली आहे का आजचा शिक्षक? अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा सर्वात मोठा दबाव
Teachers Day: गोव्यातील मारिया मिरांडांचा राष्‍ट्रपतींच्या हस्‍ते गौरव

या क्षेत्राने मला नेहमीच भुरळ घातली. आयटीआय केल्यानंतर मी एमराल्ड्स येथे मुंबईत प्रगत अभ्यासक्रम केले. महिलांना सुंदर वाटावे म्हणून त्यांना ग्रुम करणे ही माझी आवड होती. म्हणून मला त्याच संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली, जेथे मी कौशल्ये विकसित केली. अशा प्रकारे मी माझ्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा प्रसार करून माझी आवड जिवंत ठेवली आणि आयुष्यभर करत राहीन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com