Goa Marathi Academy Dainik Gomantak
गोवा

गोवा मराठी अकादमीतर्फे स्त्रीसंगम 'वंदे मातरम' संमेलन

ललित लेखिका रश्मी कशेळकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा मराठी अकादमीतर्फे 27 रोजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत स्त्रीसंगम वंदेमातरम हे महिला मराठी संमेलन होणार आहे. ललित लेखिका रश्मी कशेळकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होईल. उद्‍घाटन सत्राला अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, पौर्णिमा केरकर, मंदार नाईक उपस्थिती राहतील. दुसऱ्या सत्रात वेगळ्या वाटा या विषयावर परिसंवाद होईल. यात सुमंत सामंत (समाज-शिक्षण) व रश्मी कशेळकर (साहित्य) यांचा सहभाग असेल.

गीता गवस त्यांच्याशी संवाद साधतील. तिसऱ्या सत्रात दुपारी 12.15 वा.मीना समुद्र यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन होईल. यांत अंजली आमोणकर, स्वप्ना धुपकर, डॉ. नीता तोरणे, केतकी साळकर, डॉ. सुनेत्रा कळंगुटकर, शांभवी देशपांडे, श्रध्दा गवंडी, अंतरा भिडे, गौरी कुलकर्णी, दीपा मिरिंगकर, अंजली चितळे, रजनी रायकर, शर्मिला प्रभू, पौर्णिमा देसाई, तृप्ती बांदेकर, आसावरी कुलकर्णी, विद्या घैसास, सरोजिनी गावकर, कालिका बापट, डॉ. आरती दिनकर व चित्रा क्षीरसागर यांचा सहभाग असेल. दुपारच्या सत्रात 2.30 वा. स्मरूनी गोमंतदेवी हा गीत-संगीत-काव्य-नृत्य- नाट्य-पोवाडे असा विविधरंगी आविष्कार असलेला सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT