Green Singal Collector Asvin Chandru Dainik Gomantak
गोवा

Salcete News : ''भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जागा द्यावी'' आमदार विजय सरदेसाई

गोमन्तक डिजिटल टीम

Salcete News : सासष्टी, सध्या मडगाव व फातोर्डा भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर भटकी कुत्री दिसत आहेत. त्यांचा बंदोबस्त व देखभाल करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी मडगाव नगरपालिकेला जागा उपलब्ध करून द्यावी,

अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी जागतिक रेबिजदिनानिमित्त मडगावात आयोजित कार्यक्रमात केली. रोगी कुत्र्यांची देखभाल करण्यासाठी किंवा मेलेल्या कुत्र्यांच्या विल्हेवाटीसाठी जागेची अत्यंत आवश्यकता आहे आणि ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, की २०१८ पासून रेबिजपासून माणसे दगावलेली नाहीत ही चांगली बाब आहे. रेबिज निर्मूलनासाठी सरकारची ही चांगली मोहीम आहे हे खरे असले, तरी लोकांना कुत्र्यांपासून जी भीती वाटते ती नाहीशी करण्यासाठी जागृती आवश्यक आहे. सर्वांनी एकत्र येऊन रेबिज निर्मूलनाच्या मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाला मडगावचे आमदार दिगंबर कामत उपस्थित होते. त्यांनी सांगितले, की सध्या रेबिज निर्मूलनाचे सरकारने जे १०० टक्के लक्ष्य गाठलेले आहे, ते यापुढेही राखणे गरजेचे आहे.

यावेळी जागतिक रेबिजदिनानिमित्त घेतलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

त्यात प्रथम - प्रिंस चव्हाण (श्री दामोदर विद्यालय), द्वितीय - पूर्वी शानभाग (पॉप्युलर हायस्कूल), तृतीय - आयन बदानी (हंस सहेरा हायस्कूल), चौथे - श्रेया सोनार (पॉप्युलर हायस्कूल) यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी आयोजित प्रभातफेरीला आमदार दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई, जिल्हाधिकारी आश्र्विन चंद्रू यांनी हिरवा झेंडा दाखवला.

‘मुख्यमंत्र्यांनी जे शक्य नाही ते बोलू नये’

मुख्यमंत्र्यांनी काही ठरावीक कुत्र्यांच्या जातीवर बंदी घालण्याचे जाहीर केले आहे, पण प्रत्यक्षात ते शक्य नाही. कुणाकडे कसल्या जातीचा कुत्रा आहे हे कसे कळणार, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जे होणे शक्य नाही ते बोलू नये.

कुत्र्यांची नोंदणी करणे व त्यांच्यावर मायक्रोचीप बसवणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारने पशुसंवर्धन व पशुचिकित्सा खात्यातर्फे ही मोहीम राज्यात उघडावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

सर्वतोपरी मदतीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन ः जिल्हाधिकारी आश्र्विन चंद्रू (आयएएस) यांनी रेबिज निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्र्वासन दिले.

यंदा १५ हजार कुत्र्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे मिशन रेबिजतर्फे सांगण्यात आले. शिवाय रेबिजच्या निर्मूलनासाठी महाराष्ट्र्र व कर्नाटक राज्यांच्या सीमा भागात खास मोहीमही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT