Salcete : सासष्टी तालुका बनतोय कृषीप्रधान; 22 हेक्टर पडीक जमीन आणली लागवडीखाली

सर्वत्र हिरवीगार शेती
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Goamnatk
Published on
Updated on

Salcete taluka is becoming agricultural : सासष्टी तालुक्यात मडगाव शहराबरोबच बेताळभाटी, बाणावली, कोलवा, वेर्णा, वार्का, नुवे, राय, कुडतरी, लोटली ही गावेही प्रसिद्ध आहेत.

यातील चार गावांमध्ये समुद्रकिनारे आहेत. हा परिसर सदाच नारळाच्या झाडांनी बहरलेला असतो. शिवाय या तालुक्यात लहान-मोठी तळीसुद्धा आहेत.

मोठी शेतजमीन आहे. पूर्वी ती पडीक होती. पण गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांनी शेती लागवडीला प्राधान्य दिलेले दिसते. पडीक जमीनसुद्धा लागवडीखाली येत आहे. त्यामुळे सासष्टी तालुका कृषीप्रधान बनत चालला आहे.

Goa Agriculture
Film City to be set up in Goa: गोव्यात उभारणार फिल्मसिटी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

गेल्या वर्षी जवळजवळ 22 हेक्टर पडीक जमीन लागवडीखाली आणण्‍यात आली, अशी माहिती कृषी खात्याच्या सासष्टी कार्यालयातून मिळाली आहे. यंदा आणखी जास्त पडीक जमीन लागवडीखाली आली आहे.

शिवाय शेतकऱ्यांना कृषीकार्डे वितरित करण्यात येत आहेत. युवापिढी शेतीकडे वळू लागली आहे. ही पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन घेण्‍याकडे लक्ष देत आहे.

शेतकऱ्यांना भाजीच्या बिया वितरित केल्या जात आहेत. त्यात मिरची, वांगी, दुधीभोपळा, गवार, मका वगैरेचा समावेश आहे.

मात्र सासष्टीमध्ये जास्तीत जास्त शेतजमीन कोमुनिदादच्‍या मालकीची आहे व केवळ २० ते ३० टक्के जमीन शेतकऱ्यांची आहे. पण त्याचबरोबर कोमुनिदादच्या जमिनीत शेतकरी मुंडकार म्हणूनच शेती करतात.

Goa Agriculture
Goa Death Case: कपडे धूत असताना ती अत्यवस्थ झाली, रुग्णवाहिकाही आली पण तोवर.... ; नुवेतील घटना

भातशेतीसह भाजीपाला, फळ लागवडीवर भर

  1. कृषी खात्यातर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना कार्यान्वित करण्‍यात आल्‍या आहेत. त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात असून, त्‍याचा लाभही शेतकरी घेऊ लागले आहेत. शेतीच्‍या सभोवताली कुंपण घालणे, कीटकनाशक औषधाची फवारणी आदींसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे.

  2. भातशेतीबरोबरच काही शेतकरी आता भाजीपाला व फळांच्‍या लागवडीवर जास्त भर देत आहेत. शेतकरी आधार निधी, नारळाला आधारभूत किंमत आदीचा लाभ कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना मिळत आहे. याचाच अर्थ असा की सासष्टी तालुका कृषी क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनत आहे.

"पाच वर्षांपूर्वी सासष्‍टीतील ४९७५ हेक्टर जमीन लागवडीखाली आली होती. आता ५२०० हेक्टर जमीन लागवडीखाली आली आहे. म्हणजेच २२५ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन लागवडीखाली आलीय. शिवाय शेतकरी आता सामुदायिक शेतीवरसुद्धा भर देऊ लागले आहेत. भविष्यात कृषी क्षेत्रामध्ये सासष्टी तालुक्याचे भवितव्य उज्‍ज्वल आहे."

- सांतान रॉड्रिगीस, कुडतरी जैवविविधा समिती अध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com