Stray Dogs On Goa Beach canava
गोवा

Stray Dog Attack: चिमुकलीचा जीव गेल्यावर भटक्या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर! कचरा, आयत्या खाण्यामुळे वाढला उपद्रव; अपघातांत वाढ

Stray dog attack in Goa: बोणबाग - दुर्गाभाट येथील अडीच वर्षीय मुलीचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून तिचा जीव घेतल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

Sameer Panditrao

फोंडा: बोणबाग - दुर्गाभाट येथील अडीच वर्षीय मुलीचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून तिचा जीव घेतल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही राज्यात भटक्या कुत्र्यांनी स्थानिकांसह पर्यटकांना चावे घेतले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

फोंड्यात दर महिन्याला ८० लोकांना कुत्र्यांचा फटका बसत आहे, अनेकांचे चावे घेतले असून कुत्र्यांमुळे अपघातात वाढ होत आहे. फोंड्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव एवढा वाढला आहे, की रात्रीच्या वेळेला एकटा माणूस फोंडा तसेच लगतच्या भागातून प्रवास करू शकत नाही. केवळ फोंडाच नव्हे तर सबंध राज्यात हीच स्थिती असून रात्रीच्या वेळेला तसेच दिवसाही बऱ्याचदा भटकी कुत्री मागे लागत असल्याने दुचाकीस्वारांना अपघात होत आहेत.

कुत्र्यांनी चावे घेतल्यानंतर हे लोक एक तरी फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळ किंवा खाजगी दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेतात, त्यामुळे नेमका आकडा समजू शकत नाही, तरीपण आयडी उपजिल्हा इस्पितळातील नोंदीनुसार सरासरी ऐशीजणांना कुत्र्यांकडून चावे घेतले जातात हे स्पष्ट झाले आहे.

कुत्र्यांमुळे अपघात

दोन वर्षांपूर्वी शांतीनगर - फोंडा येथे कुत्रा मागे लागल्यामुळे एका दुचाकीस्वाराने दुचाकी जोरात पळवल्यामुळे विजेच्या खांबाला धडक दिल्याने हा दुचाकीस्वार आणि कुत्राही गतप्राण झाला होता. मयत दुचाकीस्वार रात्रीच्यावेळी पेट्रोलपंपवर अटेंडंट म्हणून कामाला होता, काम संपवून तो घरी परतताना हा प्रकार घडला होता.

पिटबूल प्रकरण...

गेल्या ऑगस्ट २०२४ मध्ये हणजूण येथे एका पिटबूल कुत्र्याच्या हल्ल्यात एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या पिटबूल कुत्र्याने अचानक या सात वर्षीय मुलावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. त्यानंतर सरकारने पिटबूल तसेच तत्सम जातीच्या कुत्र्यांवर बंदी जाहीर केली होती.

आयते खाणे मिळाल्याने आक्रमक

कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या लोकांच्या संख्येत फोंड्यात कमालीची वाढ झाली आहे. कुत्र्यांना नाक्यानाक्यावर एकत्रित करून त्यांना खाऊ घालण्यात येतो. त्यात विशेषतः शिजवलेल्या मांसाचाही समावेश असल्याने या कुत्र्यांना एक दिवस हे खाण मिळाले नाही तर मग ती हिंसक बनतात, असे एका जाणकार पशुवैद्याने सांगितले. भूतदया म्हणून ठीक आहे, पण कुत्र्यांना आयते खाणे मिळत असल्याने ते अधिक आक्रमक होतात, असेही हा पशुवैद्य म्हणाला.

बोणबागात फेकला जातो कचरा

बोणबाग - दुर्गाभाट भागातील रस्त्यांच्या कडेला अज्ञातांकडून कचरा फेकला जातो. त्यातील ओल्या कचऱ्यामुळे कुत्र्यांची झुंबड उडत असून पालिकेने कितीही आवाहने केली तरी त्याला लोक जुमानत नाहीत. या ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात येतात, असे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT