Ponda Municipality: 15 नळ कनेक्शन तोडले, 1600 आस्थापनांना बजावली नोटीस; गटारात सांडपाणी सोडणाऱ्यांना फोंडा पालिकेचा दणका

Ponda: सांडपाणी गटारात आणि रस्त्यावर सोडणाऱ्या विविध आस्थापनांसह निवासी संकुलांना नोटिसा बजावून धडक कारवाई करण्याचे सत्र फोंडा पालिकेने सुरू केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Ponda Municipality
Ponda MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: सांडपाणी गटारात आणि रस्त्यावर सोडणाऱ्या विविध आस्थापनांसह निवासी संकुलांना नोटिसा बजावून धडक कारवाई करण्याचे सत्र फोंडा पालिकेने सुरू केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पालिकेची कारवाई टाळण्यासाठी सध्या मलनिस्सारण जोडणी घेण्यासाठी अशा बेजबाबदार आस्थापनांकडून धावपळ सुरू आहे. फोंडा पालिकेने ८८ इमारतींमधील १६०० आस्थापने तसेच निवासी संकुलांना नोटिसा बजावण्यात आल्या.

फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी योगिराज गोसावी यांनी नगराध्यक्ष आनंद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू केली असून फोंडा पालिका क्षेत्रात बेजबाबदारपणाचा कळस करणाऱ्या विविध आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. फोंडा पालिकेच्या रस्त्यांवरील गटारात हे सांडपाणी सोडण्यात आले आहे. त्यातच काही ठिकाणी नाल्यांत मलमूत्र विसर्जनाचेही प्रकार होत असल्याने त्याची गंभीर दखल पालिकेने घेतली आहे.

पालिका क्षेत्रातील गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी फोंडा पालिकेने आपल्या परिक्षेत्रातील अनेकांना नोटिसा बजावल्या होत्या. एकतर मलनिस्सारण जोडणी घ्या किंवा स्वतःची व्यवस्था करा, अशी सूचना ८८ इमारतींमधील बेजबाबदार नागरिकांना केली होती. मात्र बहुतांश जणांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी पालिकेने कारवाई करीत १५ जणांचे नळ कनेक्शन तोडले, त्यानंतर या लोकांची धावपळ उडाली आहे.

Ponda Municipality
Goa Education: महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून; एकाचवेळी 5 महाविद्यालयांना देता येणार पसंती, येथे आहे अर्जाची लिंक

फोंडा पालिकेचे अभिनंदन!

स्वच्छ सुंदर फोंडा संकल्पनेसाठी विद्यमान आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक प्रयत्नरत असताना पालिका क्षेत्रातील काही बेजबाबदार नागरिकांनी थेट गटारात सांडपाणी सोडले आहे. या प्रकारामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली असून परिसर ओंगळवाणा ठरत आहे.

या प्रकाराची पालिकेने गंभीर दखल घेत संबंधितांना सांडपाण्याची योग्य व्यवस्था करण्याची सूचना केली होती, पण या सूचनेकडे काणाडोळा केल्यामुळे आता थेट कारवाई सुरू केल्यामुळे फोंड्यातील सूज्ञ नागरिकांनी पालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक तसेच मुख्याधिकारी योगिराज गोसावी यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com