stray dog Dainik Gomantak
गोवा

Panjim Stray Dogs Case: पणजीत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत होतेय वाढ; नागरिकांना त्रास

महानगरपालिकेने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज

दैनिक गोमन्तक डिजिटल

Stray Dogs are Increasing in Panjim: देशात आणि राज्यात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांच्यावर नियंत्रण आणणे कठीण होत चालले आहे.

वाढते शहरीकरण, अन्नाची नासाडी, कचरा आदी कारणांमुळे या कुत्र्यांची संख्या वाढत आहे.

पणजी शहरात एकट्याने पायी चालणे, रत्यावरून दुचाकी घेऊन जाणे कठीण होत असून स्थानिक प्रशासनाने प्रामुख्याने महानगरपालिकेने यासंबंधी गांभीर्याने पावले उचलणे व योग्य निर्णय घेत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध करून मोठ्या प्रमाणात दंड आकारणे गरजेचे आहे.

गोव्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या अंदाजे 71 हजार 590 इतकी आहे. यासोबत दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या भटक्या कुत्र्यांच्या बाढत्या संख्येमुळे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

भटक्या कुत्र्यांनी चावा घेणे, रस्त्यात आडवी येऊन अपघात घडणे अशा घटना घडतात. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

गोवा एकमेव रेबिजमुक्त राज्य

गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे जे ‘रेबिजमुक्त’ आहे. असे असले तरी रेबिजमुक्त असण्याचा रिकोर्ड सांभाळण्यासाठी भटकी कुत्री नियंत्रणात येणे तसेच मोठ्या प्रमाणात लसिकरण होणे गरजेचे आहे.

श्‍वानांच्या वाढीची कारणे

अनेकांच्या घरातील शिळे अन्न, उरलेले अन्न हे रस्त्याच्या बाजूला, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, मोकळ्या जागेत टाकले जाते. हे अन्न भटके श्‍वान खात असतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे अशा उघड्यावर अन्न टाकण्यास प्रामुख्याने बंदी घातली पाहिजे.

"पणजी महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. दुचाकीवरून जाताना अचानक रस्त्यात आल्याने अपघात होतात व श्‍वान चावा घेतात. वाढत्या श्‍वानांच्या संख्येवर पणजी महापालिकेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे."

भरत पोवार, स्थानिक नागरिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT