Stray Cattle Issue: राज्यातील भटक्या गुरांचा प्रश्न काही केल्या मिटण्याचे नाव घेत नाही. राज्यात ठिकठिकाणी भटक्या गुरांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
पोंबुर्पा गावातील रस्त्यांवर या गुरांनी आपला तळ ठोकला असून यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेकांचे अपघात झाल्याचे समोर आले आहे.
सुमारे 5 किलोमीटरचा संपूर्ण रस्ता भटक्या गुरांनी व्यापला असून त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य पोंबुर्पा रस्ता अतिशय अरुंद होता आणि आता या रस्त्यांवर भटक्या गुरांनी कब्जा केल्याने परिसरातील वाहनचालकांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही भटक्या गुरांच्या उपद्रव सहन करत आहोत. जवळपास दररोज आम्हाला आमच्या रस्त्यांवर ही गुरे आढळतात ज्यामुळे परिसरातील वाहनचालक आणि पादचाऱ्यांना तिथून जाताना समस्या निर्माण होतात.
ही गुरे कधी अचानक हल्ला करतील हे सांगता येत नाही, अशी भीती एका रहिवाशाने व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, या गुरांना रस्त्यावरून हलवणे हे एक कठीण काम आहे. कारण ते मोठ्या संख्येने फिरत असतात किंवा रस्त्याच्या मधोमध बसून असतात. स्थानिक पंचायतीने भटक्या गुरांची समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
अधिकारी ही समस्या प्रभावीपणे हाताळण्यास अक्षम असल्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, जर हे असेच राहिले तर पुढे यामुळे अपघात वाढण्याचीही भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.