Shivshaurya Yatra : शिवरायांचे तत्त्व, शौर्य आत्मसात करूया ; मुख्यमंत्री सावंत

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल गोमंतकतर्फे शिवराज्यभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शिवशौर्य यात्रा राज्यभरात काढण्यात आली.
Shivshaurya Yatra
Shivshaurya Yatra Dainik Gomantak
Published on
Updated on

Shivshaurya Yatra : म्हापसा, छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आम्हाला देव, धर्म, देशाची आठवण येते. कारण शिवरायांनीच त्यांचे रक्षण केल्यामुळे आज हिंदू संस्कृती टिकून राहिली. शिवरायांनी गोमंतक भूमीतील जुलमी पोर्तुगीज राजवटीमधील धर्मांतर रोखले तसेच मंदिरांचा विध्वंस रोखला.

युवकांनी शिवरायांचे तत्त्व, शौर्य आत्मसात करून नवभारतानिर्मिती करूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल गोमंतकतर्फे शिवराज्यभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शिवशौर्य यात्रा राज्यभरात काढण्यात आली. या रथयात्रेचा रविवारी सायंकाळी म्हापशात समारोप झाला. येथील टॅक्सी स्टॅण्डवर आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही नवभारतची निर्मिती केली जात आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराची निर्मिती याच नवभारतेचे संकेत आहेत. अलीकडे, सनातन धर्मावर अनेकांकडून आघात करण्याचा प्रयत्न चालू आहे.

मात्र, सनातन धर्म कधीच कुणीही संपवू शकत नाही किंवा कुणी तसे प्रयत्न करू नयेत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Shivshaurya Yatra
Panaji News : ''तंत्रज्ञानाचा वापर जनसेवेसाठी गरजेचा'' मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

मुख्यमंत्र्यांचे कासाळेवादन

मुख्यमंत्र्यांनी महाआरतीवेळी घुमट वादन करताना कलाकारांमध्ये बसून कासाळे वाजविले. हुतात्मा चौकातील अश्वारूढ शिवपुतळ्यास मुख्यमंत्री आणि मान्यवरांनी अभिवादन करीत पुष्पांजली अर्पण केली.

त्यानंतर शिवशौर्य यात्रा सभास्थळी मार्गस्थ झाली. सभास्थळी शिवरायांच्या कार्याची महती दर्शविणारा नेत्रदीपक नृत्याविष्कार आणि अजरामर पोवाड्यांनी ऐतिहासिक वातावरण निर्मिती केली होती.

मान्यवरांची उपस्थिती ः कार्यक्रमास मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री निळंकठ हळर्णकर,

मंत्री सुभाष फळदेसाई, जोशुआ डिसोझा, केदार नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट, प्रिया मिशाळ, महादेश आमशीकर, अखिल गोवा बजरंग दल संयोजक नीरज दनोरिया, प्रमोद सांगोडकर, सुलक्षणा सावंत व इतर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com