Ravindra Bhavan Dainik Gomantak
गोवा

Stormy Wind : वादळी वाऱ्याने मडगावच्या रवींद्र भवनचे उडाले पत्रे; जीवितहानी टळली

Stormy Wind : या संदर्भात सदस्य सचिव आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले की,२०२० साली हे पत्रे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्त केले होते. इमारतीचे बांधकाम व देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची असते.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी, यंदा पावसाचा तडाखा मडगावच्या रवींद्र भवन इमारतीलाही फटका बसला. दोनच दिवसांपूर्वी रवींद्र भवनच्या पहिल्या मजल्यावर गळती होत होती. गुरुवारी रात्री जोरदार वाऱ्यामुळे रवींद्र भवनच्या मुख्य सभागृहावरील पत्रेच उडून गेले.

एक दोन पत्रे खाली पडले तर एक पत्र खाली पडता पडता वरच अडकून राहिला. जिथे पत्रे खाली पडले तिथे वाहने पार्क करून ठेवली जातात. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

तरी आज संततधार पाऊस नसल्याने मुख्य सभागृहात पाण्याची गळती झाली नाही. आज सकाळी रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक, सदस्य सचिव आग्नेल फर्नांडिस व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली व लगेच हे पत्रे वर चढविण्यात आले.

या संदर्भात सदस्य सचिव आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले की,२०२० साली हे पत्रे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्त केले होते. इमारतीचे बांधकाम व देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची असते.

पावसाळ्यानंतर दुरुस्तीकाम !

रवींद्र भवनचे बांधकाम २००८ साली पूर्ण झाले होते. आता १६ वर्षांनी इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांच्या म्हणण्यानुसार त्यांना या सर्वस्थितीची कल्पना आहे व सार्वजनिक बांधकाम खात्याला त्याबद्दल माहिती दिली आहे. पावसाळ्यानंतर सर्व कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोव्यात गुंडाराज चालू देणार नाही'; रामा काणकोणकरांच्या न्यायासाठी विजय सरदेसाईंचे आझाद मैदानात आंदोलन

Vasco: वास्कोतील कचरा पाठवणार काकोड्यात! मुरगाव पालिकेचा निर्णय; सरकारला करणार विशेष अनुदानाची विनंती

Omkar Elephant: ‘ओंकार’चा तोरसे, तांबोसेत धुमाकूळ ! लोकांच्या जमावामुळे गोंधळ; कामात अडथळा आणल्यास गुन्हे नोंदवण्याचा इशारा

Goa Crime: घरातून ड्रग्सपुरवठा, 3 दिवस पोलिसांना हुलकावणी, पेडलर 'तेहरान' अखेर फातोर्डा पोलिसांना शरण

Goa Live Updates: महिला पर्यटकाला मनस्ताप देणाऱ्या 3 टॅक्सीवाल्यांना अटक

SCROLL FOR NEXT