परंपरेच्या नावाखाली निष्पापांचा बळी! खतना विधीदरम्यान 41 तरुणांचा मृत्यू, पालकांच्या हलगर्जीपणावर संतापले मंत्री; 41 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

South Africa Circumcision Deaths: दक्षिण आफ्रिकेतील झोसा, न्देबेले, सोथो आणि वेन्डा यांसारख्या विविध वांशिक गटांमध्ये दरवर्षी हा संस्कार मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो.
South Africa Circumcision Deaths
South Africa Circumcision DeathsDainik Gomantak
Published on
Updated on

South Africa Circumcision Deaths: दक्षिण आफ्रिकेतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. एका पारंपारिक विधीदरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत 41 तरुणांना आपला जीव गमवावा लागला. दक्षिण आफ्रिकेतील विविध समुदायांमध्ये 'खतना' हा विधी मुलाचा 'पुरुषत्व' किंवा 'प्रौढत्व' मिळवण्याचा एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. मात्र, हाच संस्कार यावर्षी अनेक कुटुंबांसाठी कर्दनकाळ ठरला.

काय आहे ही जीवघेणी परंपरा?

दक्षिण आफ्रिकेतील झोसा, न्देबेले, सोथो आणि वेन्डा यांसारख्या विविध वांशिक गटांमध्ये दरवर्षी हा संस्कार मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. या परंपरेनुसार, तरुणांना काही काळासाठी समाजापासून पूर्णपणे वेगळे ठेवले जाते. या काळात त्यांना प्रौढ आयुष्यातील मूल्ये, जबाबदाऱ्या आणि सामाजिक शिष्टाचार शिकवले जातात. या विधीचा एक भाग म्हणून त्यांचे खतना केले जाते. मात्र, अनेकदा हे विधी पारंपारिक 'दीक्षा शाळांमध्ये' (Initiation Schools) वैद्यकीय देखरेखीशिवाय पार पाडले जातात, जे तरुणांच्या मृत्यूचे मुख्य कारण ठरते.

South Africa Circumcision Deaths
South Africa Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेत रक्ताचा सडा...! 3 चिमुरड्यांसह 11 जणांचा मृत्यू; जोहान्सबर्गमध्ये अज्ञातांकडून अंधाधुंद फायरिंग

पाणी पिण्यास बंदी: अंधश्रद्धेचा फटका

दक्षिण आफ्रिकेचे पारंपारिक व्यवहार मंत्री वेलेन्कोसिनी हलाबिसा यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, अनेक दीक्षा शाळांमध्ये आरोग्य मानकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, जखम लवकर बरी व्हावी या नावाखाली तरुणांना पाणी पिण्यापासून रोखले जाते. डिहायड्रेशन आणि जखमेत होणारे संक्रमण यामुळे हे मृत्यू ओढवले आहेत.

ईस्टर्न केप प्रांत मृत्यूचा 'हॉटस्पॉट'

मंत्री हलाबिसा यांच्या माहितीनुसार, एकूण 41 मृत्यूंपैकी सर्वाधिक 21 मृत्यू हे एकट्या ईस्टर्न केप प्रांतात झाले आहेत. पालकांच्या आणि आयोजकांच्या निष्काळजीपणावर बोट ठेवत ते म्हणाले, "तुम्ही तुमच्या मुलाला अशा शाळेत पाठवता आणि त्यानंतर कधीही त्याची विचारपूस करत नाही, तो पाणी पितो की नाही हे पाहायला जात नाही, याचा अर्थ तुम्ही तुमच्या पाल्याला मृत्यूच्या खाईत लोटत आहात."

South Africa Circumcision Deaths
India VS South Africa Test: कसोटी इतिहासातील सर्वात मोठा पराभव! गुवाहाटी कसोटीत भारताचा 408 धावांनी दारुण पराभव

41 जणांना अटक; कायदे धाब्यावर

या भीषण दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत 41 जणांना अटक करण्यात आली. यामध्ये अशा पालकांचाही समावेश आहे ज्यांनी आपल्या मुलांचे वय चुकीचे सांगून त्यांना या विधीसाठी पाठवले होते. दक्षिण आफ्रिकेच्या कायद्यानुसार, केवळ 16 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांनाच पालकांच्या संमतीने या संस्कारासाठी पाठवले जाऊ शकते. तरीही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले.

South Africa Circumcision Deaths
India vs South Africa: एकदिवसीय मालिका तोंडावर असताना भारतीय संघाला मोठा धक्का; स्टार खेळाडू बाहेर, पाहा कोण?

दरवर्षी जून-जुलै आणि नोव्हेंबर-डिसेंबर या शालेय सुट्ट्यांच्या काळात हे विधी होतात. एका बाजूला मुलाच्या परतण्याचे स्वागत जल्लोषात केले जाते, तर दुसऱ्या बाजूला अशा घटनांमुळे अनेक घरांत स्मशानशांतता पसरली. सरकारने आता अशा बेकायदा दीक्षा शाळांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com