जर्मनीत बँकेची भिंत फोडून चोरी केले 290 कोटी रुपये; ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये केला होता मास्टर प्लॅन

Germany bank heist: चोरीचा खुलासा २९ डिसेंबरच्या सकाळी झाला, जेव्हा बँकेचा फायर अलार्म वाजला.
Germany Bank Heist
Germany Bank HeistX - Social Media
Published on
Updated on

बर्लिन: जर्मनीतील गेल्सेंकिर्चेन शहरात असलेल्या स्पार्कस बँकेत २९० कोटी रुपयांची चोरी झाली. चोरांनी बँकेच्या पार्किंग गॅरेजच्या भिंतीला मोठे भगदाड पाडले आणि थेट तिजोरीपर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी ३,२५० हून अधिक सेफ डिपॉझिट लॉकर तोडले आणि त्यातील रोकड व मौल्यवान दागिने घेऊन पळ काढला.

पोलिसांनुसार, चोरांनी ही चोरी ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये केली, जेव्हा बहुतेक दुकाने आणि कार्यालये बंद होती. असे मानले जात आहे की, गुन्हेगारांनी हा काळ जाणूनबुजून निवडला जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये आणि परिसरात लोकांची वर्दळही कमी असावी.

Germany Bank Heist
चुकीला माफी नाही! पडताळणीनंतर दोषी आढळणारे 'क्लब' कायमचे बंद करणार; CM प्रमोद सावंतांचा इशारा

चोरीचा खुलासा २९ डिसेंबरच्या सकाळी झाला, जेव्हा बँकेचा फायर अलार्म वाजला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आणि बँक अधिकाऱ्यांनी पाहिले की, पार्किंगमधून बँकेच्या तिजोरीपर्यंत पोहोचण्यासाठी भिंतीला मोठे भगदाड पाडले होते. या कामासाठी मोठ्या ड्रिल मशीनचा वापर करण्यात आला होता.

पोलिसांनी सांगितले की, बँकेच्या आसपास राहणाऱ्या काही लोकांनी शनिवार रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत अनेक मुखवटा घातलेल्या लोकांना मोठ्या पिशव्या घेऊन जाताना पाहिले होते. तसेच, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये काळ्या रंगाची ऑडी कारही दिसली आहे, ज्यात चोर बसले होते.

Germany Bank Heist
Viral Video: 'कांड' करायला गेला अन् भलतचं होऊन बसलं! चिमुरड्याचा निशाणा चुकला आणि आजोबांना बसला जबरदस्त फटका; व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट

पोलिसांनी या संपूर्ण चोरीची तुलना हॉलिवूड चित्रपट 'ओशन इलेव्हन'शी केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इतकी मोठी आणि नियोजनाने केलेली चोरी अनेक दिवसांच्या तयारीशिवाय शक्य नव्हती. दुसरीकडे, स्पार्कस बँकेने म्हटले आहे की, बँक आपल्या ग्राहकांच्या पाठीशी उभी आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com