सारा तेंडुलकरच्या हातातील 'त्या' बाटलीवरुन सोशल मीडियावर गदारोळ! गोव्यातील व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी सचिनच्या लेकीला केलं ट्रोल VIDEO

Sara Tendulkar Bottle Controversy: साराचा गोव्यातील आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
Sara Tendulkar Bottle Controversy
Sara Tendulkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Sara Tendulkar Bottle Controversy: सारा तेंडुलकर नेहमी आपल्या फॅशन आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र, सध्या ती एका वेगळ्याच कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. साराचा गोव्यातील आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यामध्ये तिच्या हातात असलेल्या एका बाटलीवरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

नेमका वाद काय?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सारा तेंडुलकर एका लाल रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये आपल्या तीन मित्रांसोबत गोव्याच्या रस्त्यावर मौजमजा करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये साराच्या हातात एक काचेची बाटली दिसत आहे. काही सोशल मीडिया यूजर्संनी दावा केला की, ही बाटली 'बिअर'ची आहे. या एका दाव्यावरुन सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली. अनेक ट्रोलर्संनी सारावर टीका करत म्हटले की, "अशा प्रकारे दारुला प्रोत्साहन देणे चुकीचे आहे आणि यामुळे तिचे वडील सचिन तेंडुलकर यांच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो." काहींनी तर थेट सचिन तेंडुलकरचे नाव घेऊन "मुलीला चांगले संस्कार द्यायला हवे होते," अशा आक्षेपार्ह कमेंट्सही केल्या.

Sara Tendulkar Bottle Controversy
Sara Tendulkar In Goa: सचिनची लेक सारा गोव्यात घेतेय सुट्ट्यांचा आनंद, बीच लूक चर्चेत; पाहा व्हिडिओ

चाहत्यांनी साराची घेतली बाजू

दुसरीकडे, साराचे चाहते आणि समजूतदार नेटकरी तिच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. अनेक यूजर्संनी ट्रोलर्संना खडे बोल सुनावले. एका चाहत्याने लिहिले, "सारा 28 वर्षांची सज्ञान तरुणी आहे. तिला तिचे आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. तिच्या हातात काय आहे यावरुन तिच्या वडिलांच्या प्रतिमेचा संबंध जोडणे ही संकुचित मानसिकता आहे." दुसऱ्या एका युजरने म्हटले की, "कोणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावणे बंद करा. ती बाटली नक्की कशाची आहे हे कोणालाच माहीत नाही, मग इतका गदारोळ कशासाठी?"

फिटनेस आणि व्यवसायात साराची वेगळी ओळख

सारा तेंडुलकर ही केवळ एक स्टार किड नसून ती एक यशस्वी उद्योजिका आहे. नुकतेच तिने मुंबईत स्वतःची 'पिलाटेस अकादमी' सुरु केली. सारा नेहमीच फिटनेस आणि वेलनेसला महत्त्व देते. एका जुन्या मुलाखतीत तिने म्हटले होते की, "आरोग्य म्हणजे केवळ डाएट किंवा व्यायाम नव्हे, तर संतुलित आयुष्य जगणे होय, ज्यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचा आनंद घेणेही समाविष्ट आहे."

Sara Tendulkar Bottle Controversy
Sara Tendulkar Relationship: भावा पाठोपाठ बहीण पण उरकणार साखरपुडा? सचिनच्या लेकीचा Mistry Boy कोण, गोव्यातील फोटो VIRAL

दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याबद्दल अद्याप कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. तसेच, या वाढत्या वादावर सारा तेंडुलकर किंवा तेंडुलकर कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर (Social Media) सेलिब्रिटींना विनाकारण ट्रोल करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवर पुन्हा एकदा या निमित्ताने चर्चा सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com