Ferdino Rebello Dainik Gomantak
गोवा

Enough Is Enough: गोव्यातले सर्व मेगा ‘गृह निर्माण प्रकल्प’ थांबवा! रिबेलो यांची मागणी; चांदर येथील सभेला मोठा प्रतिसाद

Ferdino Rebello Movement: बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना न्या. फर्दिन रिबेलो यांनी स्पष्ट केले की, नवीन राजकीय संस्था स्थापन केली जाणार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: सरकारतर्फे चालू असलेले गोव्यातील सर्व मेगा गृह निर्माण प्रकल्प थांबवण्याची मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी चांदर येथील ‘इनफ इज इनफ’ चळवळीअंतर्गत शनिवारी घेतलेल्या नागरिकांच्या बैठकीत केली आहे.

या प्रकल्पांना मान्यता देण्यापूर्वी गावाची क्षमता जाणून घेणे अंत्यंत आवश्यक आहे. आमची चळवळ ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या सत्याग्रहाच्या मार्गाने चालू आहे व त्यातून गोव्याला सावरण्याचा,

गोव्याची ओळख अबाधित राखण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे रिबेलो यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना न्या. फर्दिन रिबेलो यांनी स्पष्ट केले की, नवीन राजकीय संस्था स्थापन केली जाणार नाही.

न्यायमूर्ती या नात्याने आपण संविधानाचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे, ते मोडण्यासाठी नाही, असेही त्यांनी सांगितले. ‘इनफ इज इनफ’ चळवळीतील सदस्य राजकीय पक्षांशी संबंधित नाहीत, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT