sand mining in goa Dainik Gomantak
गोवा

'उगवेतील अवैध रेती उपसा थांबवा'

शेतकरी आक्रमक: कार्यवाही न केल्यास अन्य पर्याय निवडण्याचा इशारा

दैनिक गोमन्तक

पेडणे: पोलीसांच्या आवश्यक साधन सुविधा नसल्याने उगवे येथील तेरेखोल नदीत रात्रीच्यावेळी मोठ्याप्रमाणात होड्यांद्वारे बेकायदेशीररित्या रेती काढण्याचे प्रकार सर्रास सुरू असून त्यामुळे नदीचे पात्र रुंदावले आहे. यामुळे उगवे गावातील शेती व बागायती नष्ट होण्याची भीती असून त्यावर उपाय योजना करावी, अन्यथा आम्हाला अन्य पर्याय निवडावे लागतील, असा इशारा उगवे येथील शेतकऱ्यांच्या वतीने उदय महाले यांनी पेडणे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारवजा निवेदनात दिला आहे.

महाले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 10 एप्रिलच्या रात्री सुमारे साठ होड्यांद्वारे बेकायदेशीररीत्या रेती काढली जात असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. तक्रार नोंदवल्यावर रात्री पोलीस आले होते. पण नदीत जाऊन बेकायदेशीर रेती काढणाऱ्या मजूर व होड्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे होडी किंवा साधन नसल्याने डोळ्यांदेखत रेती काढणारे दिसत असतानाही हे पोलिस कारवाई करू शकले नव्हते. तर तेरेखोल येथील किनारी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन शिवोली येथील किनारी पोलिसांना लागत होता.

रविवार ता. 17 रोजी मध्यरात्री एक वाजता उगवे येथे तेरेखोल नदीत अशाच प्रकारे २२ होड्या बेकायदेशीररित्या रेती काढण्यात गुंतल्या होत्या.याबाबतीत पोलिसांना माहीती दिल्यावर रात्री १ वा.चार पोलिस घटनास्थळी आले.त्यात दोन किनारी पोलिस तर दोन पोलिस हे गस्तीवरील होते. पण नदीत उतरून कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे कसलेही साधन नसल्याने ते कुठलीही कारवाई करू शकले नाहीत. त्यासाठी किनारी पोलीसांनी बोटीद्वारे नदीत गस्त ठेवून अशा अवैध रेती काढणाऱ्या होड्या व मजुरांना ताब्यात घेऊन कारवाई करावी व आमची शेती बागायतीची जमीन वाचवावी, असे तक्रारित म्हटले आहे.

स्वप्नेश शेर्लेकर म्हणाले की, किनारी पोलिसांनी बोटीद्वारे नदीत गस्त ठेवणे आवश्यक आहे. रेती काढण्यासंबंधीचे नियम धाब्यावर बसवून रेती उपसा केला जातो. आमची संघटना याबाबत न्यायालयात जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT