गोवा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू

सावईकर आघाडीवर: काँग्रेस-भाजपमध्येच लढतीचे संकेत
Testing of candidates for Goa Lok Sabha elections begins
Testing of candidates for Goa Lok Sabha elections beginsDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: लोकसभा निवडणूक जरी दोन वर्षे दूर असली, तरी आतापासूनच त्याचे बिगूल वाजायला सुरवात झाली आहे. मागच्या वेळी ही जागा कॉग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांनी फक्त 9000 मतांनी जिंकली होती. त्यावेळी सासष्टी त्यांच्या बाजूला राहिली होती. सासष्टीत काँग्रेसला तब्बल पन्नास हजार मतांची आघाडी प्राप्त झाली होती, पण यावेळी समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने तर या निवडणुकीकरिता आतापासूनच कंबर कसली असून दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी दक्षिण गोव्यात येणाऱ्या वीस मतदारसंघाशी संपर्क साधायला सुरवात केली आहे. मागच्या वेळी त्यांचा विजय थोडक्यात हुकला होता, पण यावेळी दक्षिण गोव्याचा गड सर करणारच असा त्यांनी निर्धार केला आहे.

Testing of candidates for Goa Lok Sabha elections begins
कंत्राटावरील कामगारांना योग्य न्याय देणार: सुदिन ढवळीकर

मागच्या वेळी मडकईतून भाजपला फक्त 2000 मतांची आघाडी मिळाली होती. 2014 साली झालेल्या निवडणुकीत ही आघाडी 11000 हून अधिक होती आणि याच फरकामुळे सावईकरांचा पराभव झाला असे त्यावेळी बोलले जात होते. आता सुदिनना मंत्रिपद दिल्यामुळे मडकईबरोबर फोंडा व शिरोड्यातही भाजपला मते मिळू शकतील असा होरा व्यक्त होत आहे. त्यात परत फोंडा व शिरोड्यात भाजपचे आमदार असल्यामुळे भाजपला या दोन मतदारसंघात आघाडी मिळणे कठीण नाही. मागच्या वेळी फोंड्यात रवी नाईक हे काँग्रेसचे आमदार असूनसुध्दा भाजपने 3500 मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे यावेळी त्यांची आघाडी वाढू शकते. मात्र, काँग्रेसची इतर पक्षांशी युती झाल्यास सासष्टीत भाजपला मार बसू शकतो. आधीच सासष्टीला मंत्रिपद न दिल्यामुळे सासष्टीतले लोक नाराज दिसताहेत.

Testing of candidates for Goa Lok Sabha elections begins
धुमासेत लवकरच जलप्रक्रिया प्रकल्प

सासष्टी तालुक्यात आठ मतदारसंघ येत असल्यामुळे व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे रेजिनाल्डच्या रूपात सासष्टीला मंत्री मिळेल अशी तेथील लोकांना आशा वाटत होती, पण फोंड्यावर मंत्रिपदाची खैरात केली जात असताना सासष्टीला मात्र मंत्रिपदापासून वंचित करण्यात आले आहे. याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटू शकतात, पण त्याची भर भाजप फोंडा तालुक्यात काढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चर्चिल आलेमाव सध्या तृणमूलमध्ये असल्यामुळे त्यांची खरीच वर्णी लागेल की नाही हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. हे पाहता काँग्रेसच्या उमेदवारीबाबत संभ्रमाचे वातावरण दिसत आहे. मात्र, कॉग्रेस, तृणमूल, आप यांची युती झाल्यास व योग्य उमेदवार दिल्यास काँग्रेस दक्षिण गोव्यात भाजपला चांगली लढत देऊ शकतो असेही संकेत मिळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com