मोरशी-घोटेली येथे दुर्लक्षित अवस्थेत असलेली पावलांची प्रस्तर चित्रे दशरथ मोरजकर
गोवा

केरी सत्तरीतील प्रस्तर चित्रे दुर्लक्षित

एका मोठ्या पाषाणी दगडावर सुमारे 20 सें. मी लांब व 10 सें.मी. रुंद अशी दोन पावले आहे.

दैनिक गोमन्तक

पर्ये: सत्तरीतील( Sattari taluka) केरी ग्रामपंचायत क्षेत्राच्या मोरशीवाडा घोटेली - 2( Morshi at Ghoteli 2) व पेळावदा रावण (Pelavada Ravan) येथे असलेली प्रस्तर चित्रे (Rock Carving ) दुर्लक्षित झाल्याने त्या नष्ट होण्याच्या वाटेवर आहे.

पेळावदा रावण येथे असलेली चांद-सूर्या कोरलेली शिळा

या भागातील मोरशीवाडा येथे वाळवंटीची (River Valvanti) उपनदी असलेल्या 'गटारो' (Gataro) या नदीत 'पावलांची कोंड'( नदीचा डोह) येथे मनुष्याच्या पायांची दोन ठसे ( पावले) प्रस्तरचित्रे चितारलेली आहेत. एका मोठ्या पाषाणी दगडावर सुमारे 20 सें. मी लांब व 10 सें.मी. रुंद अशी दोन पावले आहे. ही दोन्ही पावले एकमेकांना समांतर लागून आहे. ही प्रस्तर चित्रे इतिहास पूर्व काळातील ( प्रागैतिहासिक) ( pre-historic period) असावीत असा मते इतिहास संशोधकानी व्यक्त केले होते. अशा प्रकारची पावले माऊस - सत्तरी येथे तिथल्या नदी पात्रात आढळली होती. तर अशीच पावले येथून सुमारे 4 कि. मी. अंतरावरील दोडामार्ग तालुक्याच्या विर्डीतील साबळ्याचा राय या भागातील वाळवंटी नदी पात्रात आढळली होती. विर्डीतील सदर जागेला पावलांची कोंड असे ओळखले जाते.मोरशीतील सदर प्रस्तरचित्रे सद्य पूर्णपणे दुर्लक्षित असून तिथले पाषाणी दगड फोडलेल्या स्थितीत आढळले आहे त्यामुळे त्या प्रस्तर चित्रांना धोका निर्माण झाला आहे. तेव्हा सरकारने त्याच्या संवर्धनासाठी पावले उचलावी अशी मागणी इतिहास प्रेमीकडून होत आहे.

पेळावदा येथील 'चांद-सूर्या'चे प्रस्तर नष्ट होण्याच्या मार्गावर

दरम्यान पेळावदा रावण येथील वाळवंटी नदी किनारी 'चाफरा'च्या झाडाखाली एका सुमारास 2-3 फूट उंचीच्या पाषाणी दगडावर (शीळावर) अर्धाकृती चंद्र आणि गोलाकार सूर्य अशी चित्रे कोरलेली आहे. आपल्या राजाचे शौर्य चंद्र आणि सूर्य यांचे अस्तित्व असे पर्यंत टिकून राहू दे' अशी घोषणा दर्शवणारी ही चांद-सूर्याची शिळा इतिहास काळात होत्या असे इतिहासकारांचे मत आहे. पेळावदा येथील शिळा याचीच प्रचीती देणारी असावी. गोव्यात ज्या वीरगळ अथवा गजलक्ष्मीच्या पाषाणी मूर्ती आहेत त्यामध्ये वरच्या बाजूला चांद-सूर्य कोरलेले पाहायला मिळतात.

पेळावदा येथील ही शिळा रावण गावात येत असून येथून जवळच घोटेली व मोर्ले गावाच्या सीमा जोडतात. सद्य ही शिळा नदी कठड्यावर असून पावसाच्या पाण्यावर इथल्या नदीचे कठडे कोसळत आहे. तेव्हा हा कठडा कोणत्याही क्षणी कोसळून शिळा पाण्यात जाण्याची शक्यता आहे. तेव्हा पुरातत्त्व खात्याने याची दखल घेऊन या चांद-सूर्या शिळेला संरक्षण प्रदान करावे अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT