Goa: जिल्हास्तरीय निर्यातदारांच्या मेळाव्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद

उद्योग खात्याच्या संचालिका स्वेटिका सचन यांचे प्रतिपादन
जिल्हास्तरीय निर्यातदार मेळाऴ्या अंतर्गत आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन करताना उद्योग संचालनालयाच्या संचालिका स्वेटिका सचन व इतर मान्यवर.
जिल्हास्तरीय निर्यातदार मेळाऴ्या अंतर्गत आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन करताना उद्योग संचालनालयाच्या संचालिका स्वेटिका सचन व इतर मान्यवर.Dainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: केंद्र सरकारतर्फे देशभरात वाणिज्य सप्ताह पाळला जात आहे. त्यानिमित्त उद्योग धंद्याकडे निगडीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. गोव्यातही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन राज्य व जिल्हा स्तरावर निर्यातदारांसाठी मेळावे आयोजित केले जात आहे. आज मडगावी रविन्द्र भवनात दक्षिण गोवा जिल्हास्तरीय निर्यातदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यांना राज्यभरातुन चांगला प्रतिसाद मिळत असुन महिला उद्योजकांवर आम्ही जास्त लक्ष केंद्रीत केले असुन इतर निर्यातदारही सहभागी होत आहेत अशी माहिती उद्योग, व्यापार व वाणिज्य संचालनालयाच्या संचालिका स्वेटिका सचन (आयएएस) यानी उदघाटनानंतर या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आत्मनिर्भर भारत, आजादिका अमृतमहोत्सव हे केंद्र सरकारतर्फे तर स्वयंपुर्ण गोवा, सरकार तुमच्या दारी असे अनेक उपक्रम राज्य सरकार राबवित आहे. हा मेळावा वाणिज्य सप्ताहाचा भाग असुन त्या अंतर्गत कार्यशाळा, निर्यातदारांना मार्गदर्शन, प्रदर्शने असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. भारतातुन काय निर्यात होते याची माहिती या प्रदर्शनातुन दिली जाते.

शिवाय गोव्यात आम्ही फार्मसी, सार्वजनिक उद्योग, आयटी यावर भर दिला असला तरी जास्त भर काजुप्र व फेणीवर दिला आहे असेही सचन यानी सांगितले. या सप्ताहानंतर ज्या सुचना येतील त्यांचा अभ्यास केला जाईल. या सर्वाचा अहवाल आपण राज्य व केंद्र सरकारला पाठविणार असल्याचे सचन यानी सांगितले. गोव्यात जे उत्पादन होते त्याची निर्यात जगभरात करण्यावर प्रयत्न आवश्यक असल्याचे दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजीत पंचवाडकर यानी सांगितले. गोव्यात जे उत्पादन होते त्याची निर्यात जगभरात करण्यावर प्रयत्न आवश्यक असल्याचे दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजीत पंचवाडकर यानी सांगितले.

जिल्हास्तरीय निर्यातदार मेळाऴ्या अंतर्गत आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन करताना उद्योग संचालनालयाच्या संचालिका स्वेटिका सचन व इतर मान्यवर.
शेतकऱ्यांनी भुलथापांना बळी पडू नये,दामू नाईक यांचे आवाहन

कोविडच्या काळात काही महिलांनी आपल्या छंदाला उद्योगाची जोड दिली व त्या उद्योजिका बनल्या. ही चांगली गोष्ट आहे. चांगला उद्योजक बनण्यासाठी उद्योगाची जाण, आरोग्य, आर्थिक मदत, लिंग समानता आवश्यक असल्याचे सीआयआयच्या प्रतिनिधी शितल पै काणे यानी सांगितले.या मेळाव्या अंतर्गत आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन संचालिका स्वेटिका सचन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी एएसएसओएचएएमचे चे्अरमन रॉय चांगोएल, परराष्ट्र व्यापार विकास अधिकारी व्यंकटेश राव यानी उपस्थितांना उद्योग व निर्यातसंबंधी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. रमेश गावकर यानी सर्वांचे आभार व्यक्त केले. डॉ. रुपा च्यारी यानी संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com