Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: राज्यात स्थिरता हवीय? मग भाजपला पर्याय नाही: चित्रा वाघ

विकासकामांच्या आधारे भाजप गोव्यात हॅटट्रिक साधणार

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात स्थिरता आणि सर्वच क्षेत्रांतील चौफेर विकासासाठी भाजपला पर्याय नाही, असे मत भाजपच्या केंद्रीय निवडणूक निरीक्षक आणि सोशल मीडियाप्रमुख चित्रा किशोर वाघ यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर वाघ (Chitra Wagh) सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने त्या ‘गोमन्तक’शी बोलत होत्या. (Statement of Chitra Wagh about Goa BJP)

यावेळी त्या म्हणाल्या, गोव्यात गेली 10 वर्षे भाजप सत्तेत आहे. केंद्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची (Goa BJP) सत्ता आहे. या डबल इंजिन सरकारमुळे गोव्यात दहा वर्षांत 20 -25 हजार कोटींची कामे झाली. यामध्ये राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरी-सहापदरीकरण, मांडवी नदीवरील अटल सेतू, झुआरी नदीवरील अत्याधुनिक पूल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण, कोरोनाविरोधात लढण्यासाठी ऑक्सिजन साठ्यासह आयसीयू सेंटरची निर्मिती, मोपा विमानतळ अशा अनेक साधनसुविधांची निर्मिती या सरकारने केली. शिवाय विविध सामाजिक सुरक्षा योजना राज्य काटेकोरपणे राबवत आहे. यामध्ये दयानंद सामाजिक सुरक्षा, लाडली लक्ष्मी, गृहआधार या योजनांचा समावेश आहे. या योजनांमुळे राज्यातील प्रत्येक घरात आर्थिक हातभार लागतो. शिवाय सामाजिक कल्याणाचा हेतूही साध्य होतो. हेच या सरकारचे सकारात्मक विकासाचे मुद्दे आहेत. विकास ही निरंतर प्रक्रिया असते. यासाठी सातत्याची आणि स्थिरतेची नितांत गरज असते. गोव्यात पुन्हा भाजप सरकार आल्यास ही विकास प्रक्रिया अधिक गतिमान होईल. यासाठीच गोवेकर भाजपला भरघोस मतांनी निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आघाडी केवळ स्वार्थासाठी

सर्वांगीण विकासासाठी स्थिरतेची गरज असते आणि यासाठी एकहाती बहुमताची सत्ता असावी लागते, हा अनुभव आम्ही सध्या महाराष्ट्रात घेत आहोत. आघाडी-महाआघाडी म्हणत महाराष्ट्रामध्ये बिघाडीचे राजकारण सुरू आहे. तिथला सामान्य माणूस हतबल झाला आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. एमपीएससीसारख्या गुणवत्तेच्या परीक्षा देणारी मुले आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. महिलांवर राजरोस अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात गुन्हेगार सरकार चालवते की काय, अशी स्थिती आहे. त्यामुळे गोव्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी भाजपला बहुमताच्या सत्तेची गरज आहे आणि गोवेकर ती देतील, असेही वाघ म्हणाल्या.

कायदा, सुव्यवस्थेत राज्य अग्रेसर

गोव्यातील (Goa) कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत चांगली आहे. प्रामुख्याने महिलांच्या दृष्टीने वातावरण खूपच चांगला आहे. हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने त्याला प्राधान्य असणे आवश्यक आहे. गोव्यात महिलांसाठी स्पेशल पोलिस फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून राज्य अग्रेसर असल्याचे दिसून येते. एकूणच गोव्यात अत्यंत चांगला बदल दिसत आहे, ही सरकारची जमेची बाजू आहे, असे वाघ म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "पक्षांतरबंदी हेच माझं उत्तर..." असं का म्हणाले विजय सरदेसाई? 2027 पर्यंत काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचं केलं स्पष्ट

T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, टी-20 वर्ल्डकपचे शेड्यूल लवकरच होणार जाहीर, आयसीसी मुंबईत करणार मोठी घोषणा

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

SCROLL FOR NEXT