Goa Forward Party Dainik Gomantak
गोवा

Goa: मोफत पाणी नाही हे आता लोकांनाही कळून चुकले आहे; दुर्गादास कामत

१६ हजार लिटरपर्यंत लोकांना मोफत पाणी देण्याचे दिलेले आश्‍वासन दिशाभूल करणारे आहे.

विलास महाडिक

पणजी: शिरोडा (shiroda) मतदारसंघाच्या गोवा फॉरवर्ड पक्षाच्या (Goa Forward Party) गटाध्यक्षपदी पंचवाडी पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच विशांत गावकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाचे संघटन सचिव दुर्गादास कामत (Durgadas Kamat) यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून पक्षाचा विस्तार तसेच पक्षाची रचना करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले आहेत त्यानुसार पक्षाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते अकबर मुल्ला उपस्थित होते.

१६ हजार लिटरपर्यंत लोकांना मोफत पाणी देण्याचे दिलेले आश्‍वासन दिशाभूल करणारे आहे. सरकारने १६ हजार लिटरपर्यंत पाण्याचे बिल शून्य असले तरी त्यानंतरच्या प्रति घनमीटर बिलात वाढ केली आहे. त्यामुळे मोफत असे काही नाही हे आता लोकांनाही कळून चुकले आहे.आगामी निवडणुकीसाठी युतीसंदर्भातची बोलणी अध्यक्ष विजय सरदेसाई निर्णय घेणार आहेत. त्यासंदर्भाची बोलणी सुरू आहे. कला अकादमी घोटाळासंदर्भात योग्यवेळी निर्णय त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागितली जाईल असे दुर्गादास कामत यांनी सांगितले.

दरम्यान, शिरोडा गटाध्यक्ष विशांत गावकर म्हणाले की, येत्या काही दिवसांत गट समिती निवड करण्यात येईल. २०१७ पासून गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केल्यानंतर पंचवाडी पंचायतीवर निवडून आलो. सरपंच झाल्यावर या पक्षाच्या मदतीने अनेक विकासकामे पंचवाडी पंचायतीत करण्यात आल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT