Goa: गोवा माईल्स व पर्यटन टॅक्सी मीटर प्रकरणी पणजीत धरणे आंदोलन

Goa: "वाहतूक संचालकाना हटवा, गोवा माईल्सची चैकशी करा" सुदीप ताम्हणकर व टॅक्सीचालकांचे पणजीत धरणे आंदोलन (agitation)
सुदीप ताम्हणकर व टॅक्सीचालकांचे पणजीत धरणे आंदोलन
सुदीप ताम्हणकर व टॅक्सीचालकांचे पणजीत धरणे आंदोलन Dinik Gomantak

पणजी: गोवा माईल्स व पर्यटन टॅक्सी मीटर (Goa Miles and Tourist Taxi Meter) प्रकरणी टॅक्सीचालकांनी (Taxi drivers) उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण करण्यास वाहतूक संचालक राजन सातार्डेकर हे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांची उचलबांगडी करावी. तसेच उच्च न्यायालय (High Court) आणि लोकायुक्तांनी गोवा माईल्स प्रकरणांची चौकशी करण्याचे जे आदेश दिले आहेत त्यानुसार चौकशी व्हावी. या दोन मागण्यासाठी खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी आज पणजीत टॅक्सीमालकांसह तीन तासाचे धरणे आंदोलन केले.

सुदीप ताम्हणकर व टॅक्सीचालकांचे पणजीत धरणे आंदोलन
Goa: काँग्रेसच्या सोशल मीडिया ट्रेंडला देशभर प्रचंड प्रतिसाद

पणजी येथील वाहतूक खात्याच्या समोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना ताम्हणकर यांनी सांगितले टॅक्सीमालकांनी १९ जुलै रोजी वाहतूक संचालकाना नोटीस पाठवून गोव्यतील टॅक्सीना मीटर बसवल्यानंतर गोव्याबाहेरुन ज्या टॅक्सी मीटर न बसवता येतील, त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे? याचे स्पष्टीकरण द्यावे. अशी मागणी केली होती. मात्र वाहतूक संचालकांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. वाहतूक खात्यात जी अंधाधुदी चालू आहे त्याला जबाबदार वाहतूक संचालक आहेत त्यामुळे, त्यांची हाकालपट्टी व्हावी अशी आमची मागणी असल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.

सुदीप ताम्हणकर व टॅक्सीचालकांचे पणजीत धरणे आंदोलन
Goa: पाणी प्रश्नावर वास्को वासियांचा अभियंत्याला घेराव

गोवा माईल्स प्रक्रिया कशी झाली? याची चौकशी निवृत्त न्यायाधिशामार्फत व्हावी. अशी मागणी असून लोकायुक्तनी तसे आदेश दिले आहेत. असे सांगून मुख्यमंत्री मीटर बसवले नाहीत तरी टॅक्सीचे परवाने रद्द होणार नाहीत, असे सांगतात. तर वाहतूक मंत्री परवाने रद्द करतात. याबाबातही सरकारने स्पष्टीकरण द्यावे. असी मागणी यावेळी ताम्हणकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com