Amit Patkar on Accident at Suke Kulan: Dainik Gomantak
गोवा

Dhargal-Mopa Road Accident: अपघातात स्थानिक आमदारांकडून मांडवलीचा प्रयत्न; अमित पाटकर यांचा आरोप

सुस्थितीत नसताना ट्रकला परवानगी दिली कुणी?

गोमंतक ऑनलाईन टीम

Amit Patkar on Accident at Suke Kulan: धारगल-मोपा मार्गावरील सुके कुळण येथे झालेल्या अपघातानंतर संतप्त जमावाने दोन क्रेन पेटवून दिल्या आहेत तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन सरकारला धारेवर धरले आहे.

पाटकर यांनी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यावर अपघातानंतर पोलिस स्टेशनमध्ये मांडवली केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून दुचाकीवरील आणखी एक जण जखमी झाला आहे.

नामदेव नारायण कांबळी (63 वर्षे) असे मृताचे नाव आहे. तर काशिनाथ तुकाराम शेट्ये (64 वर्षे) हे जखमी झाले आहेत. हे दोघेही मूळचे म्हापसा येथील आहेत.

पाटकर म्हणाले की, हा अपघात हे सर्वस्वी सरकारचे अपयश आहे. अपघाताला मुख्यमंत्री, वाहतूक मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री जबाबदार आहेत. हा अपघात दुर्दैवी आहे. एक जीव गेलेला असताना स्थानिक आमदार मात्र जजप्रमाणे वागत आहेत. पोलिस स्टेशनमध्ये बसून मांडवली करत आहे.

पाटकर म्हणाले, ज्यांचा जवळचा माणूस गेला त्यांच्या कुटूंबाच्या मानसिक स्थितीचा विचार करा. सरकारमुळे गोव्याच्या नागरिकांना त्रास होत आहे. वाहतूक नियम कडक केले. ते नाही पाळले तर दंड केला जातो. मग या ट्रकला का सोडले. ट्रकला नंबरप्लेट नीट नाही.

ट्रकची तपासणी केली होती का? हा ट्रक एमएच 07 या नंबरचा आहे. मग या ट्रकला परवानगी दिली होती का? म्हणजे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गोव्याच्या लोकांचा मृत्यू होत आहे आणि स्थानिक आमदार मात्र पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सेटलमेंट करत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्याकडून गौरव

Kannada Medium Schools: कानडी शाळांचा प्रश्न कर्नाटक दरबारी; मंत्री जारकीहोळी करणार मुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासोबत चर्चा

Pedne Toll Booth Case: टोल बूथ तोडफोड प्रकरण! नितेश राणे अखेर म्हापसा न्यायालयात हजर

Viral Video: अचानक कोसळलं सुपरमार्केटचं छत! क्षणात उडाला गोंधळ, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, थरार CCTV मध्ये कैद

Karnataka Tourist Death Case: चौकशीत नवे ट्विस्ट! अक्षताकडून घातपाताचा बनाव, संदीपच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात; फॉरेन्सिक अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT