Goa Illegal Liquor Seized: हैदराबादमध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या 521 बाटल्या जप्त; किंमत 12 लाख रूपये, 5 जणांना अटक

दोन कारसह एकूण 48 लाखाचा मुद्देमाल जप्त
Goa Illegal Liquor seized in Telangana
Goa Illegal Liquor seized in Telangana Dainik Gomantak

Goa Illegal Liquor seized in Telangana: तेलंगणातील घाटकेसर येथील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी स्थानिक पोलिसांसोबत मिळून केलेल्या कारवाईत पाच जणांना अटक केली आहे. गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

टी. हरिकृष्ण गौड, ए. जगडीश्‍वर, ए. सुरेंदर, बी. श्रीधर आणि पी. बालाराजू अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे 12 लाख रुपये किमतीच्या दारूच्या 521 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Goa Illegal Liquor seized in Telangana
Dhargal-Mopa Road Accident: सुके कुळण येथे ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; एक ठार, एक जखमी; संतप्त जमावाने पेटवली क्रेन

तसेच 2 कार, एक ट्रक आणि इतर साहित्य असा एकूण 48 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, हरिकृष्ण गौड याने गोव्यातील स्थानिक विक्रेत्यांकडून नॉन-ड्युटी मद्य खरेदी केले आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने हैदराबादमध्ये खाजगी वाहनांतून तस्करी केली.

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि घाटकेसर पोलिसांनी बोडुप्पल, सिद्धीपेठ आणि नाचाराम येथील अनेक ठिकाणी छापे टाकून संशयितांना अटक केली आणि दारूच्या बाटल्या जप्त केल्या. एकूण 521 दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

घाटकेसर उत्पादन शुल्क पोलिस स्टेशनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

Goa Illegal Liquor seized in Telangana
Monsoon in Goa: गोव्यात 'या' तारखेपर्यंत कमी पाऊस; IMD चा अंदाज

बोडुप्पल येथील अलगोंडा जगदीश्वर (54) हा दुचाकीस्वार संशयास्पदरीत्या वावरताना दिसला. त्याच्याकडे तपासणी केल्यावर त्याच्या वाहनातून 10 सिग्नेचर दारूच्या बेकायदा बाटल्या सापडल्या होत्या.

त्याच्याकडे चौकशी केल्यावर गोव्यातून ही दारू आणल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर मद्य तस्करी करणाऱ्या या टोळीचा छडा लागला.

यात करीमनगर जिल्ह्यातील हरिकृष्ण गौड, पीरजादीगुडा येथील जगदीश्वर (54), वारंगल जिल्ह्यातील अमुडेला सुरेंद्र (34), मेडक जिल्ह्यातील बुचिगरी श्रीधर (29) आणि बोडुप्पल येथील पुन्ना बलराजू (53) यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com