Subhash Phaldesai  Sandip Desai
गोवा

राज्यात नव्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक फेरीबोटींची गरज : फळदेसाई

निधीसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात ज्या फेरी बोटी चालतात त्या जुन्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. या फेरी बोटींना एका किनाऱ्यावरून पुरवून प्रवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फेरीबोटी आणण्याची गरज आहे,असे येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

पहिल्यांदा किमान दोन फेरीबोटी प्रायोगिक तत्वातर चालविल्या जातील, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अतिरिक्त निधीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नव्या तंत्रज्ञानावर आधारित बोटी ये जा करण्यास सुलभ असतात. त्यामुळे कमीत कमी वेळात अधिक प्रवासी प्रवास करू शकतील, वाहने फेरीत घेऊन जाणेही सुलभ होईल. आपण व्यक्तीशः अनेक फेरीबोटींची पाहणी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी नवीन फेरीची मागणी देखील होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बेतुल किल्ल्यासंबंधी बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला गोव्यातील एकमेव तसेच त्यांच्या हयातीतला शेवटचा किल्ला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे हेरून या किल्ल्याचा जिर्णोद्धार तसेच नूतनीकरण व्हावे, यासाठी शिवराज्याभिषेक कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अनेक महत्त्वाचे दस्ताऐवज पोर्तुगालमध्ये आहेत, छत्रपती शिवरायांना रोखण्यासाठी, त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी जे पत्रव्यवहार पोर्तुगीजांकडून झाले आहेत, तसेच इतर दस्तऐवज आहेत आणले तर ते सरकारला सोयीचे होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT