CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: महिला उद्योजकांसाठी नीती आयोगातर्फे होणार राज्यस्तरीय कार्यशाळा

कौशल्य विकास, वित्त साह्य याबाबत मिळणार मार्गदर्शन

गोमंतक ऑनलाईन टीम

CM Pramod Sawant: NITI आयोगाचा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म (WEP) ला गोवा सरकारचे पाठबळ लाभले आहे. या व्यासपीठाच्या सहकार्याने महिला उद्योजकांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा होणार आहे.

गोव्यातील CSIR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) च्या ऑडिटोरियममध्ये 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता कार्यशाळेस सुरवात होणार आहे. यातून स्वयंसहाय्यता गटाच्या प्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होतील.

महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म (WEP) बद्दल जागरूकता वाढवणे आणि WEP ने सुरू केलेल्या अनेक नव्या उपक्रमांची माहिती देणे, हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. कार्यशाळेत मार्गदर्शन, कौशल्य विकास, वित्त साह्य याबाबत गप्पा आणि सखोल चर्चा होणार आहेत.

कार्यशाळेत मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत, नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम हे मार्गदर्शन करतील.

बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन, पिरामल फाउंडेशन, ICAI (इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया), SIDBI, Ola Foundation आदी संस्थांचे प्रतिनिधी देखील यात सहभागी होतील. गोवा राज्य महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्ष सुलक्षणा पी. सावंत समारोपाला उपस्थित राहणार आहेत.

महिला उद्योजकांसाठी नवीन ज्ञान, अनुभव, आणि मौल्यवान संसाधने आणि पाठबळ मिळवण्यासाठी हा कार्यक्रम अनोखी संधी असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पात्रावचे बॅनर्स फाडण्याचा ‘प्रताप’

Goa: 'घर खरेदी गोमंतकीयांच्या आवाक्याबाहेर, दर 666% वाढले', राहुल देशपांडेंचे प्रतिपादन; ‘स्वयंपोषक विकास व गोवा’ सादरीकरण

Goa Road Closure: गोव्यातील 'हा' रस्ता राहणार बंद! प्रवाशांना बसणार मोठा फटका; पर्यायी मार्ग जाणून घ्या..

Bashudev Bhandari: अंधारात गाडी गेली नदीत, युवती बचावली पण 'तो' बेपत्ता; 'बाशुदेव' प्रकरणात 279 पानांचे आरोपपत्र दाखल

Ajay Gaude: माझा ‘त्या’ स्वागत समारंभाशी संबंध नाही! अजय गावडेंचे नोटिशीला उत्तर; कारवाईवरून रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT