Goa Tourism: गोव्यातील मंदिरांना मिळणार नवी झळाळी; केपे, सत्तरी, काणकोण, सावर्डेतील मंदिरांचा समावेश...

GTDC चे पाऊल; पर्यटकांसाठी उभारणार सोयी सुविधा
Goa Spiritual Tourism
Goa Spiritual TourismDainik Gomantak

Goa Spiritual Tourism: पर्यटन विभाग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आध्यात्मिक सहली सुरू करण्याच्या तयारीत असताना, गोवा पर्यटन विकास महामंडळ ( GTDC ) ने केपे, सत्तरी, काणकोण, सावर्डे येथील मंदिरांना नवे रूप देण्याचे ठरवले आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी गोव्याचे दक्षिण काशी म्हणून ब्रँडिंग करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून गोव्यातील मंदिरे दाखविण्याची गरज व्यक्त केली.

अध्यात्मिक सर्किट्समध्ये समाविष्ट करण्यात येणारी मंदिरे अद्याप ठरलेली नाहीत तरी GTDC ने महत्त्वाच्या मंदिरांमध्ये, विशेषतः सत्तरीमधील मंदिरांना नवे रूप देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

Goa Spiritual Tourism
Goa Open Defecation Free: राज्यात अद्यापही सुमारे 1850 घरांमध्ये नाही शौचालय

सत्तरी येथील मंदिरांचे सुशोभीकरण आणि रोषणाई करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी महामंडळाने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. डीपीआर तयार करण्यासाठी 50 दिवसांच्या कालावधी आहे. कन्सल्टंन्सीसाठी सुमारे 9 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

सत्तरीसह शांतादुर्गा मंदिर, श्री बेताळ नागनाथ मंदिर आणि काणकोण येथील आगोंदेश्वर मंदिराच्या सुशोभिकरणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सावर्डेत धाडे येथील श्री बेताल नागनाथ मंदिरात 4 कोटी रुपये खर्चून स्वच्छतागृहे, प्रवेशद्वार, प्रकाश व्यवस्था आणि इतर सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

आर्किटेक्चरल फर्म फोर्थ डायमेंशन आर्किटेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कामासाठी सल्लागार म्हणून काम करत आहे. हीच फर्म फातर्पा येथील शांतादुर्गा मंदिराच्या सुविधा आणि सुशोभीकरणाच्या विकासावर देखरेख करेल. या प्रकल्पासाठी अंदाजे 4 कोटी रुपये इतकाच खर्च अपेक्षित आहे.

Goa Spiritual Tourism
Goa Charter Flights: ऑक्टोबरमध्ये गोव्यात येणार 25 चार्टर फ्लाईट्स; रशिया, कझाकिस्तान, इस्रायलचे पर्यटक येणार

दरम्यान, 3.7 कोटी रुपये खर्चून काणकोणच्या अगोंदेश्वर मंदिराचे सुशोभीकरण व रोषणाई करण्यात येणार आहे. दाराशॉ आणि कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कामासाठी सल्लागार आहेत.

गेल्याच आठवड्यात, मंत्री खंवटे यांनी एका महिन्यात आध्यात्मिक पर्यटन सर्किटला अंतिम रूप देण्यात येईल, असे जाहीर केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com