Goa Medical College: माहिती कायद्यांतर्गत मागवलेली माहिती देण्यात टाळाटाळ करणे, तसेच अपुरी माहिती देणे एका अधिकाऱ्याला भोवले आहे. राज्य माहिती आयोगाने संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तसेच अर्जदाराने मागवलेली माहिती पंधरा दिवसांच्या आत मोफत देण्याचे निर्देशही दिले आहेत.
गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) चे प्रशासन संचालक आणि सार्वजनिक माहिती अधिकारी (पीआयओ) दत्ताराम सरदेसाई यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. सरदेसाई यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत अपुरी माहिती दिली होती.
त्याबद्दल गोवा राज्य माहिती आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अर्जदार अनिश बकाल यांनी माहिती अधिकार कायद्याच्या कलम 6 (1) अंतर्गत एकूण 55 मुद्यांबाबत माहिती मागवली होती. पण, त्यांना सुरवातीला माहितीच देण्यात आली नाही. तसेच नंतरच्या काळात अपुरी माहिती देण्यात आली होती.
याबाबत अनिश बकाल यांनी राज्य माहिती आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर राज्याचे माहिती आयुक्त संजय ढवळीकर यांनी संपूर्ण माहिती न दिल्याबद्दल आणि माहिती नाकारण्याचे समर्थन केल्याबद्दल सरदेसाई यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. RTI कायद्याच्या कलम 20 अंतर्गत ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
ढवळीकर यांनी बकाल यांचे दुसरे अपील निकाली काढताना सांगितले की, पीआयओ सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात अयशस्वी ठरले होते आणि नंतर प्रथम अपीलीय अधिकार्यांच्या निर्देशानंतर त्यांनी केवळ अर्धवट माहिती दिली आणि आयोगासमोर हजर राहण्याचे टाळले.
सरदेसाई यांनी त्यावर काहीही उत्तरही दिले नव्हते. संपूर्ण माहितीपासून वंचित राहिल्याने बकाल यांनी आयोगासमोर अपील केले होते.
ढवळीकर म्हणाले की, पीआयओ यांचे असे बेशिस्त वर्तन स्वीकारार्ह नाही. सरदेसाई यांना 15 दिवसांच्या आत बकाल यांनी मागितलेली माहिती मोफत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.