CM Pramod Sawant X
गोवा

Goa Housie Ban: '..बंदी घालण्याशिवाय पर्याय नव्हता'! ‘हाऊजी’ विषयावरती मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

CM Pramod Sawant: ‘हाऊजी’वरून मोठे वादंग सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या जुगाराला आळा घालण्यासाठी सरकारने ‘हाऊजी’वर पूर्णत: बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला.

Sameer Panditrao

सासष्टी: राज्यात सध्या ‘हाऊजी’वरून मोठे वादंग सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या जुगाराला आळा घालण्यासाठी सरकारने ‘हाऊजी’वर पूर्णत: बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला.

यासंदर्भात आज दवर्लीत मुख्यमंत्र्यांना विचारले असता, हाऊजी बंदीवरील निर्णय बदलला जाणार नाही. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. पूर्वी हाऊजी लहान-सहान प्रमाणात सुरू होती, तोपर्यंत ठीक होते; पण आता प्रकरण हाताबाहेर जात असल्याने बंदी घालण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

गोवा डेअरीचा नवी प्लांट उसगाव इथे स्थापन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या आहे तिथेच गोवा डेअरी राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याचा गोवा डेअरी प्लांट ५० वर्षे जुना झाला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘संजीवनी’ पुन्हा सुरू करणार

दवर्ली येथील शैक्षणिक हबसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मौन पाळणेच पसंत केले. मात्र, संजीवनी साखर कारखाना परत सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज जाहीर केला. यासंदर्भात लवकरच निविदा जारी करण्यात येईल. सध्या ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांंनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT