Housie Gambling: गोव्यात 'हाऊजीं'चा धुमाकूळ! 19 ठिकाणी आयोजन, 2 कोटींची बक्षिसे; प्रशासनासमोर रोखण्याचे आव्हान

Housie Games Goa: ‘गोमन्‍तक’ने आवाज उठविल्‍यानंतर केपे येथील दोन हाऊजी शोला प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी हाऊजींचे आयोजक तेवढ्यावर थांबलेले नाहीत.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Housie events in Goa

मडगाव: दै. ‘गोमन्‍तक’ने आवाज उठविल्‍यानंतर केपे येथील दोन हाऊजी शोला प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी हाऊजींचे आयोजक तेवढ्यावर थांबलेले नाहीत, हे आता स्‍पष्‍ट झाले आहे. कारण ४ एप्रिल ते ११ मे या कालावधीत तब्‍बल १९ ठिकाणी हाऊजींचे आयोजन केल्‍याच्‍या जाहिराती ठिकठिकाणी झळकल्‍या आहेत.

सोशल मीडियावरही या शोची धडाक्‍यात जाहिरातबाजी सुरू आहे. विशेष म्‍हणजे, या १९ हाऊजी शोमध्‍ये एकूण २.१७ कोटी एवढ्या प्रचंड रकमेची बक्षिसे ठेवण्‍यात आली आहेत. त्‍यामुळे या ‘हाऊजी’ सरकारपुढे एक आव्‍हान बनून उभ्‍या राहिल्‍या आहेत.

एका बाजूने पोलिस आणि जिल्‍हा प्रशासन ‘आम्‍ही हाऊजींचे आयोजन करू देणारच नाही’ असे सांगत आहे, तर दुसऱ्या बाजूने हाऊजी आयोजकांनी प्रशासनाच्‍या नाकावर टिच्‍चून जाहिरातबाजी सुरू केली आहे. विशेष म्‍हणजे, यातील नऊ शो ‘लेंट’ या ख्रिश्‍‍चन धर्मियांच्‍या पवित्र महिन्‍यात आयोजित केले आहेत.

इस्‍टरनंतर आणखी दहा शो आयोजित केले जाणार आहेत. इस्‍टरच्‍याच दिवशी म्‍हणजे, २० एप्रिल रोजी वेळसांव, सुरावली आणि नावेली अशा तीन ठिकाणी या हाऊजी होणार आहेत. वेळसांव येथे १५ लाख, नावेली येथे १० लाख, तर सुरावली येथे ६ लाखांची बक्षिसे ठेवली आहेत.

Goa Crime News
Housie Gambling: केपेमध्ये म्युझिकल शोच्या नावाखाली 'हाऊजी शो', 'गोमन्तक'च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची कडक कारवाई

समाज माध्‍यमांवरून जी माहिती प्रसारित झाली, त्‍यात ४ एप्रिल रोजी मायणा-कुडतरी येथे हाऊजीचा कार्यक्रम होणार असून यातील एकूण बक्षिसांची रक्‍कम ७ लाख एवढी आहे. ५ एप्रिल रोजी वेर्णा, कुंकळ्‍ळी व केपे येथे हाऊजींचे आयोजन केले असून या तिन्‍ही ठिकाणी प्रत्‍येकी १५, १० व ४ लाखांची बक्षिसे ठेवली आहेत.

आतापर्यंत या हाऊजी शाेला दक्षिण गोव्‍यातूनच अधिक प्रतिसाद मिळत असून हे जे १९ शो आयोजित केले आहेत, त्‍यापैकी एकच शो उत्तर गोव्‍यातील आगशी येथे होणार असून बाकीचे १८ शो दक्षिण गोव्‍यात होणार आहेत. ११ मे रोजी वार्का येथे आयोजित केलेल्‍या हाऊजी बक्षिसाची रक्‍कम तब्‍बल २० लाख एवढी प्रचंड आहे. यामुळे आता या हाऊजींचे आक्रमण प्रशासन कसे रोखणार, याबाबत प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे.

Goa Crime News
Quepem Housie: केपेत 28, 4 लाखांच्या ‘हाऊजी’! ‘म्‍युझिकल शो’च्‍या नावाखाली फोफावतोय जुगार; प्रशासनाची डोळेझाक

केपे पालिकेकडून नाेटीस

केपेत होणाऱ्या हाऊजींना स्‍थानिकांकडून विरोध होत असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर केपे पालिकाही सतर्क झाली आहे. केपे पालिका उद्यानात ४ एप्रिल रोजी एका संगीत रजनीचे आयोजन केले आहे. मात्र, या संगीत रजनीवेळी आयोजकांना हाऊजीचे आयोजन करता येणार नाही, अशा आशयाची नोटीस केपे पालिकेने आयोजकांना पाठविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com