Goa Taxi Young Entrepreneur Scheme Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: ‘गोंयचो टॅक्सी पात्रांव’ योजनेस प्रारंभ

55 लाभार्थींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅक्सी सुपूर्द; गोवा माईल्सची पर्यावरणपूरक सेवा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Taxi Young Entrepreneur Scheme: गोंयचो टॅक्सी पात्रांव योजनेस (गोवा वाहतूक उद्योजक योजना) आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रारंभ केला.

या योजनेमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घरात टॅक्सी पोहोचणार असून लोकांना स्वयंपूर्ण करणारी ही योजना असून याचा लाभ गोमंतकीयांनी घेतला पाहिजे, असे मत डॉ. सावंत यांनी व्यक्त केले.

यावेळी त्यांच्यासोबत वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, गोवा माईल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्कर्ष दाभाडे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेअंतर्गत 55 लाभार्थींना टॅक्सी सुपूर्द करण्यात आल्या. या योजनेतून एकही पैसा न देता लाभार्थीला टॅक्सी मिळणार आहे. यासाठी प्रारंभी पेडणेवासीयांना प्राधान्य दिले आहे, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

बसेससाठीही योजना!

कोरोना महामारीनंतर अनेक खासगी बसेस बंद झाल्या. त्यामुळे आता नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यासाठी ‘गोंयचो टॅक्सी पात्रांव’ योजनेच्या पार्श्‍वभूमीवर नवी योजना सुरू केली जाईल, ज्यात खासगी बसेस भाडेपट्टी घेतल्या जातील.

कदंब महामंडळाद्वारे ही योजना चालवण्यात येणार असून खासगी बसेसवर कदंबचे वाहक असणार आहेत, अशी माहिती वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

सीएनजी, ई-चार्जिंग सुविधा

‘गोंयचो टॅक्सी पात्रांव’ योजनेत दिल्या जाणाऱ्या टॅक्सी सीएनजीवर चालणार असून टॅक्सी व्यवसाय पर्यावरणपूरक होईल, असे सरकारचे धोरण आहे.

त्यासाठी वर्षभरात बस स्थानक, रेल्वे स्थानक, पेट्रोल पंप या ठिकाणी सीएनजी आणि ई-चार्जिंग सुविधा सक्तीच्या केल्या जातील. यापुढे टॅक्सी व्यवसायात ई- वाहनांचा वापर होणार आहे. ग्राहकांनाही सवलतीच्या दरात प्रवास करता येईल, असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT