Goa Taxi: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'या' तारखेपर्यंत ब्लू कॅबसाठी काऊंटर सुरू होणार

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली माहिती
Mauvin Godinho
Mauvin GodinhoDainik Gomantak
Published on
Updated on

Mauvin Godinho on blue cab: काळी आणि पिवळी टॅक्सी ही जुनी संकल्पना आहे. आम्ही ब्लू कॅब संकल्पनेचा विचार करत होतो. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्लू कॅबसाठी स्वतंत्र काऊंटर निर्माण केले जाईल, अशी माहिती गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

Mauvin Godinho
Goa Crime: 2015 मध्ये झाला विनयभंग; 8 वर्षांनी संशयिताला अटक

माविन गुदिन्हो म्हणाले की, गोवा ट्रान्सपोर्ट आंत्रप्रुनर योजनेतून कारचे हस्तांतरण केले गेले आहे. पेडणे तालुक्यातील लोकांसाठी ही योजना आहे. कारण मोपा येथील विमानतळ पेडणेतील लोकांमुळे गोव्याला मिळाले आहे.

पेडण्यातील लोकांनी आपल्या जमिनी या विमानतळासाठी दिल्या. अशा प्रकारची योजना मी माझ्या मतदारसंघासाठी किंवा मुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघासाठी करू शकले असते, असेही गुदिन्हो म्हणाले.

मोपा विमानतळ कार्यान्वित झाल्यापासून स्थानिक पेडणे तालुक्यातील टॅक्सी चालकांकडून सातत्याने स्वतंत्र टॅक्सी काऊंटरची मागणी केली जात होती. त्यासाठी वेळोवेळी निवेदने, आंदोलने टॅक्सी चालकांकडून करण्यात आली होती. राज्य सरकारनेही त्यांची ही मागणी करणार असल्याचे सांगत त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com