Valmiki Naik Goa AAP X
गोवा

Goa Politics: राज्यातील बेरोजगारीवर श्वेतपत्रिका काढा, गोवा आपची मागणी; सर्व गौडबंगाल असल्याची टीका

Goa AAP: पदांसाठी एक वर्षाचा अनुभव अनिवार्य केला आहे, जो गोमंतकीय तरुणांसाठी घातक असून राज्यातील बेरोजगारीवर सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कर्मचारी निवड आयोगाच्या बदललेले नियम अन्यायकारक आहेत. त्यात एलडीसी आणि ज्युनियर स्टेनोग्राफर पदांसाठी एक वर्षाचा अनुभव अनिवार्य केला आहे, जो गोमंतकीय तरुणांसाठी घातक असून राज्यातील बेरोजगारीवर सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्यावतीने आज करण्यात आली.

आम आदमी पक्षाच्या येथील कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत वरील मागणी करण्यात आली. याप्रसंगी कार्याध्यक्ष वाल्मिकी नाईक, उपाध्यक्ष प्रा. रामराव वाघ आणि नेते सुनील सिगणापूरकर यांची उपस्थिती होती.

नाईक म्हणाले, भाजप सरकारवर राज्यातील युवकांना रोजगारापासून वंचित ठेवून परप्रांतीयांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करीत आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडमधील नोकरभरती संदर्भातील अनियमिततेवर त्यांनी बोट ठेवले. अभियंता पदांवरील भरती प्रक्रिया प्रक्रिया रद्द करून पुन्हा जाहिरात काढण्यात आली. त्यामुळे गोमंतकीय पात्र ठरले होते म्हणून प्रक्रिया रद्द करण्यात आली का? असा सवाल त्यांनी केला. एमपीटीमध्ये १५-२० वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या गोमंतकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती नाकारली जात असल्याचा आरोप केला.

सिंगणापूरकर यांनी साबांखाच्या निविदा प्रक्रियेमधील अनियमिततेचा बोट ठेवले. मध्य प्रदेशातील एका कंत्राटदाराला गोवा प्रमाणपत्र नसतानाही निविदा स्पर्धेत सामील होऊ दिले गेले. गोमंतकीय कंत्राटदारांनी विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी याला ‘मानवी चुका’ असल्याचे सांगितले जाते, यात सर्व गौडबंगाल असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT