Goa Politics: चर्चेशिवाय काही बोलल्यास 'ती' त्याची वैयक्तिक भूमिका! पाटकरांचे स्पष्टीकरण; ‘इंडिया’ आघाडी टिकण्यासाठी चोडणकरांचा पुढाकार

Goa Congress: काँग्रेससारख्या राष्ट्रीय राजकीय पक्षाचा राज्यातील अध्यक्ष म्हणून आपण गोव्यातील ४० मतदारसंघांत बूथ आणि संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु याचा अर्थ वेगळ्या मार्गाने कोणी घेऊ नये आणि चर्चेशिवाय पक्षातील कोणीही कोणतेही विधान करू नये, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले आहे.
Amit Patkar, Girish Chodankar
Amit Patkar, Girish ChodankarDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेससारख्या राष्ट्रीय राजकीय पक्षाचा राज्यातील अध्यक्ष म्हणून आपण गोव्यातील ४० मतदारसंघांत बूथ आणि संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु याचा अर्थ वेगळ्या मार्गाने कोणी घेऊ नये आणि चर्चेशिवाय पक्षातील कोणीही कोणतेही विधान करू नये, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले आहे.

समाज माध्यमावर संदेश देत पाटकर यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना एकप्रकारे सूचित केले आहे. जर कोणी काही बोलले असेल, तर त्याची ती वैयक्तिक भूमिका असल्याचीही पुष्टी त्यांनी जोडली आहे. झेडपी निवडणुकीबाबत पक्षाशी चर्चा करून भूमिका मांडू असेही पाटकर यांनी नमूद केले आहे.

Amit Patkar, Girish Chodankar
Goa Sunburn: ‘सनबर्न’मधील ध्वनिप्रदूषण, ड्रग्सचा वापर; जनहित याचिकेवर होणार सुनावणी, गोवा सरकारच्या भूमिकेवर लक्ष

यावरून दक्षिण गोव्यातील जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक मानावी लागणार काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दोन दिवसांपासून सावियो हे बाणावलीतील निवडणूक आपण लढवणार असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. त्यामुळे पाटकर यांच्या संदेशामुळे एकप्रकारे सावियो सेफमोडमध्ये जातील असे दिसते.

काही बोलण्यापूर्वी चर्चा करावे असे पाटकर यांनी पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना सुचविले असले तरी जिल्हाध्यक्ष म्हणून डिसिल्वा यांनी पाटकर यांच्याशी चर्चा केली आहे का? हाही प्रश्न आता पुढे येत आहे.

Amit Patkar, Girish Chodankar
Tiger Attack: ..अचानक समोर आला वाघ! हल्ला करणार इतक्यात; चोर्ला घाटातील थरारक प्रसंग वाचा

भाजपविरुद्ध एकत्रित लढणे गरजेचे

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीबाबत स्थानिक नेते आणि राष्ट्रीय नेते बोलणार आहेत. गोव्यावर परिणाम करणाऱ्या भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात एकत्र येऊन लढणे, हेच आमचे प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी समाज माध्यमावर दिली आहे. यावरून चोडणकर यांना एकप्रकारे ‘इंडिया’ आघाडी टिकली पाहिजे, असे स्पष्ट दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com