3D Projection at Old Goa Dainik Gomantak
गोवा

St. Xavier Exposition: गोव्यातील सर्वात मोठी चर्च उलघडून दाखवणार 3D इफेक्ट्ससह शव प्रदर्शनाचा इतिहास

3D Projection at Old Goa: ओल्ड गोव्याच्या चर्चाचा इतिहास आणि काही महत्वाच्या घटनांचे प्रदर्शन होणार आहे

Akshata Chhatre

ओल्ड गोवा: गेल्या अनेक दिवसांपासून गोवाआणि गोव्याबाहेरील भाविक सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शनाची वाट पाहत आहेत आणि आता या सोहळ्याला केवळ एक दिवस बाकी राहिला आहे. जुने गोवे किंवा ओल्ड गोवा इथे बुधवार (दि. 20 नोव्हेंबर) पासून सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शनाला सुरुवात होईल. या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांना सेंट झेवियर यांचा जीवनपट उलघडून दाखवला जाईल.

शव प्रदर्शनच्या दरम्यान से कॅथेड्रल चर्चच्या भिंतीवर थ्रीडी इफेक्ट्ससह ओल्ड गोव्याच्या चर्चाचा इतिहास आणि काही महत्वाच्या घटनांचे प्रदर्शन होणार आहे. या माध्यमातून इतिहास समोर यावा तसेच उपस्थितांना गोष्टींच्या माध्यमातून सेंट झेवियर यांचे कार्य उलघडून दाखवता यावे म्हणून हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

एकूण सात दिवसांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत दर अर्ध्या तासाच्या अंतरात 5-7 मिनिटाचे क्लिप्स दाखवले जाणार आहेत आणि यासाठी संध्याकाळी 7 ते 10 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.

तयारी कुठवर आली?

शव प्रदर्शनाच्या वेळी आलेल्या सर्व यात्रेकरूंची व्यव्यथा सेंट जोसेफ वाझ रीन्युअल सेंटर, पेस्टॉरल इंस्टीट्यूट , से कॅथेड्रल येथे करण्यात येणार आहे. याशिवाय चर्चपासून काही किलोमीटर अंतरावर पिलग्रिम व्हिलेजची उभारणी करण्यात आली असून यामध्ये 200 लोकांच्या राहण्याची सहज व्यवस्था केली जाईल.

भाकीया प्रॉपर्टीवर पार्किंगची सोय केली जाणार आहे. या ठिकाणी दिव्यांग किंवा इतर आजरी लोकं देखील गाड्या पार्क करू शकतात. शिवाय चर्चच्या मागच्या बाजूला असलेली जागा पाद्री आणि इतर धर्मांगुरूंसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. याजागेत कॉयर गायक देखील त्यांच्या गाड्या उभ्या करू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT