Goa ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: आरक्षणावरून 'एसटी' आक्रमक, दोन दिवसांत पुढील भूमिका ठरणार; चळवळीचे नेतृत्व पुन्हा प्रकाश वेळीप यांच्याकडे

Goa ST Reservation: ‘एसटी’ना राजकीय आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून सध्याच्या भाजप सरकारने आपल्याला झुलवत ठेवले आहे, अशी भावना आता या समाजामध्ये रुजू लागली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: ‘एसटी’ना राजकीय आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून सध्याच्या भाजप सरकारने आपल्याला झुलवत ठेवले आहे, अशी भावना आता या समाजामध्ये रुजू लागली आहे.

आरक्षण मिळवायचे असेल तर अधिक आक्रमक होण्याची गरज व्यक्त केली गेली आहे. मडगावच्या नानूटेल हॉटेलमध्ये झालेल्या एसटी समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत भाजप सरकारविरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘एसटी’ना या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळणार की नाही, याबद्दल येत्या दोन दिवसांत आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांनी स्पष्टता द्यावी. अन्यथा दोन दिवसांनंतर हा समाज पुढील भूमिका काय घ्यायची याचा निर्णय घेईल, असे ठरविण्यात आले. तसेच राज्यातील एसटी चळवळीचे नेतृत्व पुन्हा एकदा माजी मंत्री प्रकाश वेळीप यांच्याकडे देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

आजच्या या बैठकीला आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर, सभापती गणेश गावकर, आमदार गोविंद गावडे, माजी मंत्री प्रकाश वेळीप, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. ही बैठक सरकारी नव्हती तर ‘एसटी’ समाजाची होती, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या सरकारातील काही नेते वेगवेगळ्या समाजांना पुढे काढून एसटी आरक्षण हा मुद्दा मागे सारण्याच्या हेतूपुरस्सर प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

‘एसटीं’ना फसविले जातेय : गोविंद शिरोडकर यांचा घणाघाती आरोप

या बैठकीला हजर असलेले ‘मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन’चे प्रमुख नेते गोविंद शिरोडकर यांनी, हे सरकार ‘एसटी’ना फसवू पाहत आहे, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन ‘एसटी’ समाजाची भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे सांगितले.

‘एसटी’ आरक्षण मिळविण्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न : तवडकर

यासंबंधी मंत्री रमेश तवडकर यांना विचारले असता, एसटी समाजापुढील जे प्रश्न आणि समस्या आहेत, त्यावर तोडगा कसा काढावा या उद्देशाने ही बैठक बोलावली होती. या बैठकीत राजकीय आरक्षण या विषयावरही चर्चा झाली. ‘एसटी’ना हे आरक्षण मिळावे, यासाठी माझे सर्व प्रयत्न सुरू आहेत.

‘उटा’ संघटना पुन्हा होणार सक्रिय

समाजासाठी एकत्र येण्याचा निर्णय प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात जाहीर केला होता. ही चळवळ सक्रिय करण्यासाठी ‘उटा’ ही शिखर संघटना पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

‘उटा’ अध्यक्षपदी पुन्हा वेळीपच

राज्यातील एसटी चळवळ अधिक सक्रिय करण्यासाठी ‘उटा’ ही संघटना पुन्हा सक्रिय करून या संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रकाश वेळीप यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT