Viresh Borkar CM Pramod Sawant Closeness Dainiak Gomantak
गोवा

Goa Politics: वीरेश यांच्या वाढत्‍या प्राबल्‍यामुळे कथित संघर्षाची पडली ठिणगी; खरेच फूट की पक्षाला प्रकाशात आणण्‍यासाठी नवे ‘प्रँक’?

Viresh Borkar CM Pramod Sawant Closeness: सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांची सत्ताधाऱ्यांशी विशेषतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी वाढलेली जवळीक सध्या चर्चेची ठरली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांची सत्ताधाऱ्यांशी विशेषतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी वाढलेली जवळीक सध्या चर्चेची ठरली आहे. सांतआंद्रे मतदारसंघातील भू-रुपांतराविरोधात बोरकर यांनी केलेले आंदोलन आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेला प्रतिसाद पाहता या चर्चेत तथ्य असावे.

या साऱ्याची दृश्य सुरवात विधानसभा अधिवेशनावेळी झाली. सांतआंद्रे मतदारसंघातील प्रश्न बोरकर मांडत असताना सत्ताधारी बाकांवरून त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसे. काही मोघम उत्तरे देत वेळ मारून नेली जात असे. बोरकर पोटतिडकीने, मुद्देसूदपणे बोलत; पण सरकारच्या लेखी त्याचे महत्त्व फारसे नसे. मुख्यमंत्रीही थेट आश्वासन देण्याचे टाळणे पसंत केले होते.

अलिकडे मात्र ती परिस्थिती पालटली होती. आपण विरोधकांचीही कामे करतो असे सांगताना विधानसभेत मुख्यमंत्री बोरकर यांचा दाखला देत होते. तेही त्याला विरोध करत नव्हते. विरोधकांसोबत बोरकर सत्ताधाऱ्यांविरोधातील आंदोलनात जरूर होते; मात्र देहबोलीवरून सत्ताधारी आणि त्यांच्यात फारसे मतभेद राहिले नव्हते, असेच दिसून येत होते.

त्यानंतर सुरू झाले ते सांतआंद्रे मतदारसंघात नगरनियोजन कायद्याच्या ३९-अ कलमांतर्गत मंजूर केलेले प्रकल्प/भू रुपांतरांविरोधातील आंदोलन. या आंदोलनामुळे बोरकर राज्यव्यापी नेते झाले. सरकारविरोधात चार हात करण्याची ताकद असलेला आमदार म्हणून त्यांची छबी सर्वांनाच भावली. नगर व ग्राम नियोजन खात्याच्या कार्यालयातून जबरीने बाहेर काढण्याचा एखादा प्रकार वगळता सरकारने त्यांना फारशी सापत्नभावाची वागणूक दिली नाही.

आंदोलन तापले असताना मुख्यमंत्री मोबाईलवर त्यांच्याशी चर्चा करू लागले. चर्चा करण्यासाठी शिष्टाचार बाजूला ठेऊन मुख्यमंत्री आझाद मैदानावरही गेले. दिलेले आश्वासन पाळले. त्यानंतर बोरकर यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले. त्यानंतर खासगी इस्पितळात दाखल झाले. तेथेही त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री पोचले. या साऱ्यामुळे राजकीय व सामाजिक जीवनात बोरकर यांचे वजन कमालीचे वाढले.

त्यातच त्यांनी ब्रिटनचा दौरा केला. अनेक जणांना ते तिथे भेटले. एक आमदार असूनही मंत्र्याच्या थाटात तेथे त्यांचे स्वागत झाले. ब्रिटनमधील काही सत्ताधाऱ्यांशी त्यांच्या गाठीभेटी झाल्या. यावरून गोव्याविषयी प्रेम असणाऱ्या विदेशस्थ गोमंतकीयांतही त्यांची एक छबी तयार झाली. यामुळे बोरकर यांच्याविषयी असूया निर्माण होणे साहजिक होते. त्यातूनच आजचा कथित पक्षांतर्गत संघर्ष उभा राहिला, अशी ती राजकीय चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT