Goa Accident: गोव्यात आला अन नियतीनं घात केला! उत्तर प्रदेशच्या 30 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू; ट्रकनं दिली जोरदार धडक

Uttar Pradesh Youth Death In Goa: रोजगाराच्या शोधात गोव्यात आलेल्या उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील एका ३० वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वेर्णा-लोटली बगल मार्गावर मंगळवारी घडली.
Uttar Pradesh Youth Death In Goa
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: रोजगाराच्या शोधात गोव्यात आलेल्या उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील एका ३० वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वेर्णा-लोटली बगल मार्गावर मंगळवारी घडली. प्रमोद निशाद असे मृत तरुणाचे नाव असून तो दोनच दिवसांपूर्वी गोव्यात आला होता. पायी चालत जात असता, त्याला ट्रकची धडक बसल्याने हा मृत्यू झाला हे नंतर पोलिस तपासात उघडकीस आले. ट्रकचालकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद हा मूळचा उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी होता. तो दोनच दिवसांपूर्वी रोजगाराच्या शोधात गोव्यात आला होता. आज तो वेर्णा-लोटली मार्गावरून पायी चालत जात असताना एका भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, प्रमोदचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात की घातपात याबाबत संभ्रम होता, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता, ट्रकच्या धडकेमुळेच हा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

Uttar Pradesh Youth Death In Goa
Goa Boat Accident: कारवारची मच्छीमारी बोट बेतुल समुद्रात बुडाली!२२ जणांना वाचविले: इतर बोटीतील मच्छीमारांची धाडसी कामगिरी

अपघाताची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून संबंधित ट्रकचा शोध घेतला आणि ट्रकचालकाला अटक केली आहे. ट्रकचालकाविरोधात निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत प्रमोदचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवण्यात आला असून त्याच्या नातेवाइकांना या घटनेची कल्पना देण्यात आली आहे.

Uttar Pradesh Youth Death In Goa
Goa Accident: स्कूटरवरील नियंत्रण सुटले अन् होत्याचे नव्हते झाले! बांबोळीत मुंबईच्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

दोनच दिवसांपूर्वी गोव्यात आलेल्या तरुणावर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेर्णा औद्योगिक वसाहतीचा परिसर असल्याने या मार्गावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. अनेकदा पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग नसल्याने अशा दुर्दैवी घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मिर्झापूरमधील एका गरिबाचा मुलगा घरची परिस्थिती सुधारण्यासाठी गोव्यात आला होता, मात्र त्याचे रोजगाराचे स्वप्न आणि आयुष्याचा प्रवास वेर्णाच संपला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com