SSC Result 2024  Dainik Gomantak
गोवा

SSC Result 2024 : ‘हेडगेवार’ची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

SSC Result 2024 :सलग अठराव्‍या वर्षी मिळविले नेत्रदीपक यश : ११७ पैकी ८५ विद्यार्थी विशेष श्रेणीत झाले उत्तीर्ण

गोमन्तक डिजिटल टीम

SSC Result 2024 :

पणजी, कुजिरा येथील डॉ. के. बी. हेडगेवार विद्यालयाने दहावीच्‍या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा सलग अठराव्‍या वर्षी कायम राखली आहे.

यंदा ११७ विद्यार्थी प्रविष्‍ठ झाले होते. त्‍यातील ८५ विशेष श्रेणीत, २८ प्रथम श्रेणीत तर ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. १८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्‍यांहून अधिक गुण मिळविले.

नेहा आमोणकर (गणित), वैदेही सावईकर (विज्ञान व इलेट्रॉनिक्‍स), अभिनव कापडी (समाजशास्र), वामन कोरडे (खगोलशास्र), पूर्वी देसाई, युक्ता सावईकर, यशवंत महाजन (खगोलशास्र) यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले. तसेच नेहा आमोणकर (९६.६), अवनीश सावंत (९६), वैदेही सावईकर (९४), गौतमी देसाई (९४), स्‍नेह जुवारकर (९३.५), मृण्‍मयी सोमण (९३.५), सान्‍वी कामत (९३.५),

अथर्व शेट्ये (९३.१), परेश धुरी (९२.६), अभिनव कापडी (९२.५), पूर्वी देसाई (९२.५), हर्ष गावडे (९२), नीती आमोणकर (९१.८३), यशवंत महाजन (९१.६), मुक्ता जोगळेकर (९१.३३), अन्‍वय च्‍याती (९१.३३), ऋषिकेश शेणवी बोरकर (८९.६७), रेघना शशिकांत भामईकर (८९.६७) यांनी विद्यालयातून घवघवीत यश प्राप्‍त केले. दरम्‍यान, मुख्‍याध्‍यापक विलास सतरकर व शाळेचे व्‍यवस्‍थापक सुभाष देसाई यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्‍यांना पुढील वाटचालीस शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT