Sreejita De And Michael Blohm-Pape Dainik Gomantak
गोवा

जर्मनीत चर्चमध्ये बांधली लग्नगाठ, आता बंगाली रितीरिवाजांनुसार अभिनेत्रीला गोव्यात दुसऱ्यांदा करायचाय विवाह

दोघांच्या 'व्हाइट वेडिंग'चे फोटो अलिकडेच समोर आले होते.

Pramod Yadav

Sreejita De And Michael Blohm-Pape

बिग बॉस 16 व्या सिझनमधील स्पर्धेक आणि अभिनेत्री श्रीजीता डेने जर्मनीतील हॅम्बर्ग येथे तिचा प्रियकर मायकेल ब्लोहम-पेपशी विवाह केला. दोघांच्या 'व्हाइट वेडिंग'चे फोटो अलिकडेच समोर आले होते. चर्चमध्ये लग्न केल्यानंतर आता श्रीजीता गोव्यात बंगाली पद्धतीने दुसरे लग्न करणार आहे. असे एका वृत्तवाहिनीला माहिती देताना श्रीजीताने सांगितले.

आम्ही दोघांनी जर्मनीत चर्चमध्ये लग्न केले आणि लवकरच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बंगाली रितीरिवाजांनुसार गोव्यात लग्न करणार आहोत. असे श्रीजीता डे म्हणाली.

आमचे लग्न बंगाली रितीरिवाजाने होणार असले तरी आम्ही गोव्यात लग्न करणार आहोत. आम्ही लग्नासाठी नियोजन सुरू केले आहे. नोव्हेंबरपासून पर्यटक गोव्यात यायला लागतात, त्यामुळे आम्ही रिसॉर्ट बुकिंगसाठी प्रयत्न करत आहोत. आमचे लग्न समुद्रकिनार्यावर होईल. मायकलही बंगाली पद्धतीने लग्न करण्यासाठी उत्सुक आहे. असे श्रीजीता म्हणाली.

अभिनेत्री श्रीजीता आणि मायकल खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. तिचा नवरा मायकेल ब्लोहम-पेप एका जर्मन कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतो. तो काही काळ मुंबईत राहत होता आणि बिग बॉस दरम्यान त्याने श्रीजीताला खूप सपोर्ट केला होता.

एका कॅफेमध्ये हे जोडपे पहिल्यांदा एकमेकांना भेटले आणि एकमेकांच्या जवळ आले. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. बंगाली पद्धतीने लग्न करण्यासाठी दोघांचे कुटुंब खूप उत्सुक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT