सकाळी चरण्यासाठी सोडलेल्या गाई परत आल्याच नाही, फर्मागुडीत शॉक लागून चार गुरे दगावली

फर्मागुडीत वीजेचा शॉक लागून चार गायींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Farmagudi
Farmagudi Dainik Gomantak
Published on
Updated on

Four cows died due to electrocution In Farmagudi

फर्मागुडीत वीजेचा शॉक लागून चार गायींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नितीन प्रभू गावकर यांच्या मालकीची ही गुरे होती. गावकर यांचे अंदाजे 40 ते 50 हजारचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली.

नितीन प्रभू गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी त्यांनी गायींना चरण्यासाठी बाहेर सोडले होते. दरम्यान, मुख्य वीज वाहक लाईन तुटून खाली पडली होती. त्याच्या संपर्कात आल्याने गायींचा मृत्यू झाला असे गावकर म्हणाले.

यावेळेत कोणी व्यक्ती वीज लाईनच्या संपर्कात न मोठी दुर्घटना टळली. पण प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलून भविष्यात अशी घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी गावकर यांनी केली. नुकसान भरपाई बाबत कोणती मागणी केली नसल्याचेही गावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Farmagudi
Goa Assembly Monsoon Session: टोमॅटो दरवाढ विधानसभेत! सरदेसाई म्हणाले मोफत वाटा, नाईक म्हणतात झळ नाही

मागील महिन्यात वीजेच्या झटक्याने पर्वरीत दगावली होती गाय

जूनमध्ये पर्वरीत GCA मैदानात साचलेल्या तळी जवळ वीजेचा झटका लागल्याने भटकी गाय दगावली होती. भटकी गाय GCA मैदानाजवळून जात असताना जवळ असणाऱ्या वीज खांबाच्या जिवंत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com