Tribal culture  Dainik Gomantak
गोवा

आदिवासी जीवन-संस्कृती कार्यशाळेला काणकोण येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

काणकोण: अभ्यास आणि संशोधनकार्य हे विषयाच्या खोलात जाऊन करणे आणि तटस्थपणे आपली बाजू मांडणे, हा लेखकाचा गुण सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ लेखक प्रतापसिंह वेळीप काणकर यांनी व्यक्त केले.

देळे-काणकोण येथील मल्लिकार्जुन आणि चेतन मंजू देसाई महाविद्यालयाच्या कोकणी विभागातर्फे गावडोंगरी येथे ‘आदिवासी जीवन संस्कृती’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्‌घाटक व मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

दिवसभर चाललेल्या सत्रात सर्जनशील लेखन सराव आणि उमेद याविषयी ज्येष्ठ लेखक कमलाकर म्हाळशी, रामनाथ गावडे, देविदास गावकर, डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी मार्गदर्शन केले.

सुप्रिया काणकोणकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष महेश वेळीप यावेळी उपस्थित होते. हाजीर-गावडोंगरी सरकारी माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक दामोदर गावकर यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य यशवंत गावकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT